Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning Today 14th June 2023 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

1. Cyclone Biparjoy : ‘बिपरजॉय’चं संकट! कुठे आणि केव्हा धडकणार, चक्रीवादळामुळे किती नुकसान होऊ शकतं? जाणून घ्या सविस्तर…

Cyclone Biporjoy Update : भारताला बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biparjoy) धोका आहे. चक्रीवादळ गुजरातच्या (Gujrat) दिशेने पुढे सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात किनारपट्टीवर (Gujrat Costal Area High Alert) अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुजरात किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच हवामान विभागाकडून सातत्याने हवामान आणि चक्रीवादळाबाबतची माहिती देण्यात येत आहे. वाचा सविस्तर 

2. बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, 30 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणारे हे वादळ काही दिवसांत गुजरातमध्ये धडकण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. हे वादळ खूप भीषण स्वरूप धारण करू शकते, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 30 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. वाचा सविस्तर

3. Weather : कुठे उष्णतेची लाट तर कुठे मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather updates : भारतातील अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट (Heatwave) सुरू आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह, अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. यामुळं लोक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे केरळ आणि आंध्र प्रदेशात मान्सूनने हजेरी लावली आहे. त्यामुळं तेथील नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला आहे. तर बिपरजॉय चक्रीवादळामुळं अनेक राज्यांचे हवामान आल्हाददायक राहिले आहे. वाचा सविस्तर 

4. Monsoon Update : मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाची हजेरी; चक्रीवादळामुळे काही भागात उकाड्यापासून दिलासा, विदर्भाची प्रतिक्षा कायम

Monsoon Update : मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) तसेच राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर (Palghar) परिसरात पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी संध्याकाळपासून मुंबईसह उपनगरात रिमझिम पाऊस (Rain Update) पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातही मंगळवारपासून पावसाची संततधार सुरु आहे. पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील तापमान घटलं आहे. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. राज्यातही अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. वाचा सविस्तर 

5. Farmers Protest : हरियाणातील शेतकरी आंदोलनाला यश, अखेर मागण्या मान्य; हमीभावानं होणार सूर्यफुलाची खरेदी

Haryana Farmers Protest: हरियाणातील (Haryana) शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला यश आलं आहे. अखेर सरकारनं सूर्यफुलाची हमीभावानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हमीभावाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कुरुक्षेत्रमध्ये दिल्ली-चंदीगड महामार्ग जाम करून धरणे आंदोलन सुरु केलं होतं. वाचा सविस्तर 

6. मी दोषी नाही… डोनाल्ड ट्रम्प कोर्टात शरण; व्हाईट हाऊसमधीस संवेदनशील कागदपत्रांच्या चोरीचा आरोप

Donald Trump Secret Document Case: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) मंगळवारी (13 जून) मियामीच्या फेडरल कोर्टात दाखल झाले होते. गोपनीय कागदपत्रं बाळगल्याच्या (Secret Document Case) आरोपांना सामोरं जाण्यासाठी ट्रम्प दाखल झाले आणि याप्रकरणी त्यांनी आत्मसमर्पण केलं. न्यूज एजन्सी एएफपीनं दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ट्रम्प यांनी आपल्याला दोषी ठरवू नये, अशी विनंतीही न्यायालयाला केली आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात शेकडो गोपनीय कागदपत्रे आपल्याकडे ठेवल्याचा आरोप आहे.  तपास यंत्रणांनी ट्रम्प यांच्यावर या प्रकरणांमध्ये आरोप निश्चित केले आहेत. वाचा सविस्तर 

7. WTC फायनलमधील पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडला BCCI कडून इशारा, गोलंदाजी आणि फलंदाजी कोचबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता

BCCI Warns Indian Team Support Staff : भारताकडून दुसऱ्यांदा जागतिक कसोटी विश्वचषकाचं (ICC World Test Championship) विजेतेपद हुकलं आहे. टीम इंडिया (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्यापर्यंत (WTC Final 2023) पोहोचली पण, भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील (WTC) पराभवानंतर टीम इंडियाच्या (Team India) खेळांडूसह आता सपोर्ट स्टाफवरही (Team India Support Staff) टीका करण्यात येत आहे. BCCI ने भारताच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफला इशारा दिला आहे. वाचा सविस्तर 

8. 14th June In History: जागतिक रक्तदाता दिन, राज ठाकरे यांचा वाढदिवस, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचं निधन; आज इतिहासात

14th June In History: जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. आजचा दिवस सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. आज जागतिक रक्तदाता दिन आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक आणि अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज जन्मदिन आहे. तर, बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचं निधन आजच्या दिवशी झालं. यासह आजच्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी पाहूया 14 जूनचे दिनविशेष. वाचा सविस्तर 

9. Horoscope Today 14 June 2023 : वृषभ, धनु, मकर, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचं राशीभविष्य

Horoscope Today 14 June 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मिथुन राशीच्या लोकांच्या व्यवसायात वाढ होईल. कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा बुधवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

[ad_2]

Related posts