Vijay Shivtare agressive on Ajit Pawar amid lok sabha elections

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vijay Shivtare Vs Ajit Pawar : त्याला आता माझा आवाका माहिती पडेल, शिवतारेंचा थेट इशारा

जसं अमोल मिटकरी म्हणालेत, की अजित पवारांची स्थिती महाभारतातील अर्जुनाप्रमाणे झालीय.. आता त्याच अर्जूनाचा पार्थ कोण होणार.. ? राजकीय धर्मयुद्धात अजित पवारांना यश येणार की नाही.. हे लवकरच कळेल.. घरच्यांच्या विरोधला तोंड द्यावं लागत असतानाच अजित पवारांना मित्रपक्षांतील नेत्यांचाही विरोध सहन करावा लागतोय.. विजयबापू शिवतारेंनीही दादांविरोधात दंड थोपटलेत.. त्यांनी उगारलेली विरोधाची तलवार म्हणायला आज म्यान केलीय.. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, ४ दिवसांत दोनदा शिवतारेंशी चर्चा केली.. मन वळवण्याचा प्रयत्न केला.. पण विरोधातली तलवार म्यान करत असताना शिवतारेंचा आक्रमकपणा मात्र, कायम होता.. त्यांनी माध्यमांशी चर्चा करत असतानाच, एकनाथ शिंदेंनी केलेलं एक अत्यंत महत्वाचं विधान सांगितलं.. ज्यानं अजित पवार गटाकडून रोष पाहायला मिळू शकतो.. काय म्हणाले शिवतारे पाहूयात..

[ad_2]

Related posts