zomato launches pure veg fleet for vegetarian food delivery netizens split casteist criminal move vs amazin initiative marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Zomato Launhes Pure Veg Fleet : ऑनलाईन फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटो आपल्या ग्राहकांना नवीन सेवा आणि सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करत असते. नुकतीच झोमॅटोने शुद्ध शाकाहारींसाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल आणि मांसाहारी पदार्थ ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणाहून जर तुम्हाला अशा ठिकाणाहून जेवण घेण्यापासून जर टाळायचं असेल तर अशा लोकांसाठी झोमॅटोने ही सेवा सुरु केली आहे. झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ‘Pure Veg Fleet’ आणि ‘Pure Veg Mode’ लॉन्च केलं आहे. या प्युअर व्हेज मोडमध्ये फक्त व्हेज ग्राहकांसाठी रेस्टॉरंट्सचा समावेश केला आहे. ज्या हॉटेल्समध्ये मांसाहारी पदार्थ मिळतात अशा रेस्टॉरंट्सना यापासून दूर ठेवलं जाईल. 

Zomato CEO ने सोशल मीडियावर दिली माहिती 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या सेवेचे वर्णन करताना झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल म्हणाले, की हा प्युअर व्हेज मोड आणि प्युअर व्हेज फ्लीट कोणत्याही विशिष्ट धर्म किंवा राजकीय पक्षाच्या सेवेसाठी आणलेला नाही. प्युअर व्हेज रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करू इच्छिणाऱ्या लोकांना या माध्यमातून विशेष सेवा मिळणार आहे. गोयल यांनी पुढे लिहिले की, “भारतात जगातील सर्वात जास्त शाकाहारी लोक राहतात. तसेच, आतापर्यंत आम्हाला मिळालेल्या फीडबॅकमधून हेच दिसून आलंय की शाकाहारी लोक हे आपल्या जेवणाच्या बाबतीत फार अलर्ट असतात, काळजी घेतात. आपल्याला समोर आलेलं अन्न कसं शिजवलं आहे याबाबत ते फार सतर्क असतात.”

सोशल मीडियावर टीका

या सेवेबाबत काही लोकांनी सोशल मीडियावर झोमॅटोच्या सीईओवर टीका केली आहे. एका युजरने कमेंट करून लिहिले की, ‘झोमॅटोच्या प्युअर व्हेजमुळे भेदभाव होऊ शकतो. “अशी अनेक उदाहरणे आहेत जेव्हा लोकांनी फूड डिलीव्हरी नाकारली कारण डिलिव्हरी एजंट मुस्लिम होते. त्यांनी वापरलेला युक्तिवाद देखील असा होता की “आमच्या अन्नाची शुद्धता खराब होऊ नये असे आम्हाला वाटत नाही”. मला आश्चर्य वाटणार नाही जर ‘ शुद्ध शाकाहारी’ झोमॅटो उपक्रमामुळे अधिक भेदभाव झाला पाहिजे.’ दुसऱ्याने लिहिले – ‘ॲप काढून टाकत आहे. मी पुन्हा कधीही Zomato वापरणार नाही. हे जातीयवादी आणि गुन्हेगारी आहे. कोणीतरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करेल अशी आशा आहे.” असे अनेक वापरकर्ते झोमॅटोच्या या उपक्रमाला भेदभावपूर्ण म्हणत आहेत. त्याचवेळी काही वापरकर्ते याला एक उत्तम उपक्रम म्हणत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

Truecaller New Feature : आता स्पॅम कॉल्सपासून होणार सुटका! Truecaller मध्येही नवीन AI फीचर; ‘असा’ करा वापर

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts