airtel payments bank smartwatch noise and mastercard partnership wrist tap and pay contactless payment marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Airtel Payments Bank Smartwatch : आपल्या रोजच्या जीवनातील व्यवहारासाठी आपण पैसे किंवा कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी फोनचा (Mobile) वापर करतो. मात्र, आता यूजर्स, ग्राहकांसाठी ही सुविधा आणखी सोपी झाली आहे. याचं कारण म्हणजे, एअरटेल (Airtel) कडून असा स्मार्टवॉच (Smartwatch) लॉन्च करण्यात आला आहे ज्याद्वारे तुम्ही अगदी सहज पेमेंट करू शकणार आहात. आपल्या यूजर्सना सुलभ आणि सर्वोत्तम पेमेंट अनुभव मिळावा यासाठी कंपनीने एअरटेल पेमेंट्स बँक स्मार्टवॉचची घोषणा केली आहे. याच्या माध्यमातून यूजर्स कॉन्टॅक्टलेस पेमेंट करू शकतात. 

वेअरेबल (Wearble) ब्रँड Noise ने एअरटेल पेमेंट्स बँक आणि मास्टरकार्डसह भागीदारी (Partnership) केली आहे. एअरटेल पेमेंट्स बँक स्मार्टवॉचमध्ये यूजर्सना टॅप आणि Pay चा ऑप्शन मिळतो. या घड्याळाद्वारे यूजर्स 1 रुपयांपासून ते 25 हजार रुपयांपर्यंत पैसे देऊ शकतात. पेमेंट व्यतिरिक्त या घड्याळात उत्कृष्ट फीचर्स देखील आहेत.

पेमेंट व्यतिरिक्त भन्नाट फीचर्सही मिळतील  

या घड्याळात तुम्हाला1.85 इंचाचा डिस्प्ले तर मिळणार आहेच, पण त्याचबरोबर 550 निट्सच्या पीक ब्राईटनेसचा देखील सपोर्ट करतो. याशिवाय हे स्मार्टवॉच इतर स्मार्टवॉच प्रमाणेच तुमच्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घेऊ शकते. वॉचमधील हेल्थ फीचर्समध्ये हार्ट स्पीड मॉनिटर, SpO2 सेन्सर, स्लीपलेस ट्रॅकर, मेन्स्ट्रुअल सायकल मॉनिटर आणि 130 स्पोर्ट्स मोड यांसारख्या भन्नाट फीचर्सचा समावेश आहे. तुम्ही ते अगदी सहज वापरू शकता. 

स्मार्टवॉचमध्ये तीन रंगांचे पर्याय मिळू शकतात

या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग फंक्शन आणि एका चार्जवर 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप आहे. याशिवाय, स्मार्टवॉचमध्ये मास्टरकार्ड नेटवर्क सपोर्टेड NFC चिप देखील देण्यात आली आहे. याशिवाय या स्मार्टवॉचमध्ये 150 क्लाउड आधारित सानुकूलित घड्याळाचे चेहरे देखील उपलब्ध आहेत. या स्मार्टवॉचला IP68 रेटिंग देखील आहे, ज्यामुळे ते पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्याची क्षमता देते. 

नॉईज आणि एअरटेल पेमेंट्स बँकेच्या या स्मार्टवॉचमध्ये, यूजर्स थँक्स ॲपद्वारे त्यांच्या बचत अकाऊंटशी कनेक्ट करण्यात सक्षम असतील. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टवॉचची किंमत 2 हजार 999 रुपये आहे. यासोबतच हे स्मार्टवॉच तुम्हाला तीन वेगवेगळ्या कलरच्या पर्यायांमध्ये मिळू शकते. या कलरमध्ये ब्लॅक, ग्रे आणि ब्लू या तीन वेगवेगळ्या कलरचा ऑप्शन तुम्हाला मिळू शकतो.  

महत्त्वाच्या बातम्या : 

Truecaller New Feature : आता स्पॅम कॉल्सपासून होणार सुटका! Truecaller मध्येही नवीन AI फीचर; ‘असा’ करा वापर

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts