Nitesh Karale will contest Lok Sabha elections from Wardha Lok Sabha constituency Nitesh Karale Met Sharad Pawar marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर होताच निवडणुका लढवण्याऱ्यांची देखील संख्या वाढतांना पाहायला मिळत आहे. त्यातच आता सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड चर्चेत असलेले नितेश कराळे (Nitesh Karale) म्हणजेच कराळे मास्तरांनी देखील लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांचा आशीर्वाद असल्यास मी वर्धा लोकसभा मतदारसंघातून (Wardha Lok Sabha Constituency) निवडणूक लढवणार असल्याचे कराळे गुरुजी म्हणाले आहेत. पुण्यात आले असतांना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.  

दरम्यान यावेळी बोलतांना कराळे गुरुजी म्हणाले की, “मी मागे काही भेटी घेतल्या. पवार साहेबांचा आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल तर मी वर्धामध्ये लोकसभा निवडणूक नक्की लढवेल. स्थानिक पातळीवर मला मोठा पाठिंबा आहे.  प्रचंड मताने मी विजयी होऊ शकतो, हाच निरोप मी आज शरद पवारांकडे घेऊन आलो होतो. महाविकास आघाडीमधल्या कुठल्या ही घटक पक्षाकडून मी निवडणूक लढवू शकतो. पवार साहेब माझ्याबाबत सकारात्मक असल्याचे” कराळे म्हणाले आहेत. 

उमेदवारीबाबत संध्याकाळपर्यंत निश्चित होईल 

पुढे बोलतांना कराळे गुरुजी म्हणाले की, “असंविधनक सरकार चुकीचे निर्णय घेत आहेत. एक तरुण पिढी आणि युवकांनी राजकारणात यावी असं पवार यांचे मत आहे. मी माझ्या बाजूने तयारी सुरू केलेली आहे, संध्याकाळपर्यंत निश्चित होईल. अपक्ष लढतीच्या बाबत आत्ता सांगता येणार नाही,” असेही कराळे म्हणाले आहेत. 

कोण आहेत कराळे मास्तर….

वर्धा जिल्ह्यातील कराळे गुरुजी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. त्यांचे स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ नेहमी चर्चेत असतात. ग्रामीण भागातील बोलीभाषेतून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. सोबतच, राज्यातील राजकीय घडामोडींवर देखील ते भाष्य करत असतात. सोशल मीडियावर त्यांना मोठी पसंती आहे. त्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. त्यामुळे याचाच फायदा त्यांना निवडणुकीत देखील मिळू शकतो असे त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. त्यामुळे आता कराळे गुरुजी लोकसभा निवडणुकीत उभे राहणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

पवारांच्या भेठीसाठी इच्छुकांची गर्दी…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अशात शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी देखील वेगवेगळ्या मतदारसंघात इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे मागील चार-पाच दिवसांपासून शरद पवारांची भेट घेणाऱ्या इच्छुकांनी गर्दी वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. कालच बीड लोकसभा मतदारसंघासाठी ज्योती मेटे यांनी पवारांची भेट घेतली. तर, कराळे गुरुजी यांनी देखील भेट घेतली आहे. त्यामुळे पवारांच्या भेठीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Vijay Shivtare VIDEO : जुन्या गोष्टी विसरू नका, पवारांचा बदला घ्यायची हीच वेळ, यावेळी मला साथ द्या; विजय शिवतारेंची भोरच्या अनंतराव थोपटेंना साद

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts