Akola Lok Sabha constituency Shiv Sena thackeray group Akola city chief rajesh mishra Candidacy announced by mla Nitin Deshmukh maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha Election 2024 : अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Akola Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज उमेदवाराची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मावळत्या महापालिकेतील शिवसेना (Shiv Sena) गटनेते राजेश मिश्रांच्या उमेदवारीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. राजेश मिश्रा हे यापूर्वी दोन टर्म नगरसेवक राहिले असून त्यांची आई तसेच मिश्रा यांच्या पत्नी या देखील नगरसेवक राहिल्या आहेत. त्यामुलळे अकोला पश्चिम मतदारसंघात राजेश मिश्रा यांची ओळख तळागाळातला नेता म्हणून प्रचलित आहे.

आज अकोला (Akola) येथे आयोजित आढावा बैठकी मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी (MLA Nitin Deshmukh) राजेश मिश्रा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात इतर पक्षांना चांगलाच जोर लावावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. 

आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता? 

अकोला पश्चिम मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ राहिला आहे. मात्र आज आमदार नितीन देशमुखांनी महाविकास आघाडीतून राजेश मिश्रा यांची उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसला लोकसभा जिंकायची असेल तर अकोला पश्चिम मतदारसंघ ठाकरे गटाला सोडावा लागेल, असा ठाकरे गटाने काँग्रेसवर दबावतंत्राचा अवलंब केल्याचे देखील बोलले जात आहे. परिणामी, महाविकास आघाडीत बिघाडी तर होणार नाही ना, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

दुसऱ्या टप्प्यात पोटनिवडणुकीची घोषणा

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांच्या विजयाने तब्बल 29 वर्षांनंतर सत्ता मिळवण्यात यश आले होते. मात्र 4 नोव्हेंबर 2023 रोजी गोवर्धन शर्मा यांनी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाल्याने भाजपची मोठी राजकीय हानी झाली. त्यांच्या निधनाने हा मतदारसंघ रिक्त होता. तर त्यावेळी राज्यात विधानसभा निवडणुकीला एक वर्षांपेक्षाही कमी कालावधी असल्याने पोटनिवडणूक होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता.

तर अनेक राजकीय पक्षानी संभाव्य पोटनिवडणुकीची शक्यता लक्षात घेता या मतदारसंघातून लढण्याची तयारी देखील सुरू केली होती. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर  संधू , ज्ञानेश कुमार यांनी अकोला पश्चिम मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला पोटनिवडणुक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे या मंतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जवळ जवळ सर्वच पक्षानी जोरदार तयारी केल्याचे बघायला मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts