csk vs rcb chennai super kings matheesha pathirana fit before first match

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई :आयपीएलच्या 17 (IPL 2024) वा हंगाम थोड्याच वेळात सुरु होणार आहे.आयपीएलमधील पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात होणार आहे. चेन्नईला पहिल्या मॅचपूर्वी गुड न्यूज मिळाली आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना ( Matheesha Pathirana) याच्या दुखापतीमुळं मोठं आव्हान निर्माण झालं होतं. मात्र, पहिल्या मॅचपूर्वी दुखापतग्रस्त मथिशा पथिराना फिट असल्याचं समोर आल्यानं चेन्नईचं टेन्शन मिटणार आहे. मथिशा पथिराना फिट असल्यानं चेन्नईसाठी ही मोठी गुड न्यूज आहे.  

चेन्नई आणि आरसीबी यांच्यात पहिली मॅच चेन्नईच्या चेपॉकवर होणार आहे. पहिल्या मॅचला काही वेळ शिल्लक असताना पथिरानाच्या मॅनेजरनं तो फिट असल्याचं सांगितलं आहे. पथिरानच्या मॅनेजरनं सोशल मीडियावर पोस्ट करुन पथिराना कुठं आहे? याचं उत्तर पथिराना बॉलिंगसाठी तयार आहे, असं म्हटलं.  

मथिशा पथिराना बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत जखमी झाला होता. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनं तो ग्रस्त होता. यामुळं आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यातून तो बाहेर जाईल अशी शक्यता होती. आत मात्र, मथिशा पथिराना पूर्णपणे फिट असल्यानं चेन्नईला दिलासा मिळाला आहे. आरसीबीविरुद्ध तो पहिली मॅच खेळणार की नाही हे पाहावं लागेल.  

मथिशा पथिराना हा चेन्नई सुपर किंग्जचा हुकमी एक्का आहे.2023 च्या आयपीएलमध्ये पथिरानानं चेन्नईसाठी 12 मॅच खेळल्या होत्या. यामध्ये त्यानं 19.53 च्या सरासरीनं 19 विकेट घेतल्या होत्या. तर, त्याची इकोनॉमी 8.01 इतकी होती.  

चेन्नईनं कॅप्टन बदलला

चेन्नई सुपर किंग्जनं 2024 च्या आयपीएलसाठी महेंद्रसिंह धोनी ऐवजी ऋतुराज गायकवाडकडे कप्तानपद सोपवलं आहे. महेंद्रसिंह धोनीच्या कप्तानपद सोडण्याच्या निर्णयाचं स्वागत करतो, असं चेन्नईच्या टीम मॅनेजमेंटनं म्हटलं आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड आता चेन्नईचं नेतृत्त्व करणार आहे. एकेकाळी चेन्नईसाठी खेळलेल्या फाफ डु प्लेसिस आता आरसीबीचं नेतृत्त्व करत आहे.  

धोनी पर्वाची अखेर

चेन्नई सुपर किंग्ज संघानं आयपीएलमध्ये 2022 चा अपवाद वगळता सर्व हंगामामध्ये कप्तानपद महेंद्रसिंह धोनी याच्याकडे दिलं होतं. 2022 च्या आयपीएलमध्ये रवींद्र जडेजानं चेन्नईचं नेतृत्त्व केलं होतं. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईनं पाचवेळा विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नईचा कप्तान म्हणून धोनी पर्व आता संपलं आहे. महेंद्रसिंह धोनीच्या जागी आता ऋतुराज गायकवाड याला तो वारसा पुढे चालवावा लागेल. ऋतुराज गायकवाड आता चेन्नईला सहावं आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

संबंधित बातम्या:

CSK vs RCB Score Live IPL 2024: ‘माही’ मैदानाबाहेर चेंडू टोलावणार, किंग कोहली सलामीला येणार; CSK-RCB आज भिडणार

आयपीएल फुकटात कशी, कधी अन् कुठे पाहावी?; जाणून घ्या….

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts