[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IPL 2024, CSK vs RCB : चेपॉकच्या स्टेडियमवर सलामीच्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस यानं नाणेफेकीचा निर्णय घेतला. फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी आरसीबीच्या डावाची सुरुवात केली. फाफ डु प्लेसिस यानं आरसीबीला आक्रमक सुरुवात करुन दिली. फाफ डु प्लेसिसने चौकारांचा पाऊस पाडला. दीपक चाहरची गोलंदाजी फोडून काढली. पण चेन्नईनं जोरदार कमबॅक केले. फक्त एका धावांच्या अंतरात आरसीबीच्या तीन धुरंधर फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. बिनबाद 41 वरुन… तीन बाद 42 अशी दैयनीय अवस्था आरसीबीची झाली. मुस्तफिजुर रहमान यानं एकाच षटकात आरसीबीच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबी प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली. कर्णधार फाफ डु प्लेसिस यानं आक्रमक फलंदाजी केली. त्यानं एकापाठोपाठ एक चौकारांचा पाऊस टाकला. फाफ डु प्लेसिस यानं 8 चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. फाफ डु प्लेसिस यानं 23 चेंडूत 35 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला विराट कोहली शांत आणि संयमी फलंदाजी करत होता. पण दुसऱ्या बाजूला एकापाठोपाठ एक विकेट पडल्या. मुस्तफिजुर रहमान यानं एकाच षटकात आरसीबीच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. मुस्तफिजुरने आधी धोकादायक फाफ डु प्लेसिस याला 35 धावांवर बाद केले. त्यानंतर रजत पाटीदार याला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला. रजत पाटीदार याला खातेही उघडता आले नाही. हे कमी होतं की काय म्हणून पुढच्याच षटकात मॅक्सवेलही बाद झाला. दीपक चाहर यानं ग्लेन मॅक्सवेल याला धोनीकरवी झेलबाद केले. 8 षटकानंतर आरसीबीने तीन बाद 55 धावा केल्या आहेत. सध्या विराट कोहली आणि कॅमरुन ग्रीन खेळत आहेत. कॅमरुन ग्रीन 8 तर विराट कोहली 9 धावांवर खेळत आहे.

चेन्नईकडून दीपक चाहर याने 3 षटकात 25 धावांच्या मोबदल्यात 1 विकेट घेतली आहे. मुस्तफिजुर रहमान याने एका षटकात चार धावा खर्च करत दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. रवींद्र जाडेजा, महिश तिक्ष्णा, तुषार देशपांडे यांना विकेट घेण्यात अपयश आले.

आरसीबीची प्लेईंग 11 -

फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, कर्ण शर्मा, मयांक डांगर, मोहम्मद सिराज, अल्जारी जोसेफ

चेन्नईची प्लेईंग 11 -

रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, डॅरेल मिचेल, महिश तिक्ष्णा, रवींद्र जाडेजा, एमएस धोनी, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, दीपक चाहर

[ad_2]
फाफनं स्फोटक सुरुवात केली, पण एका धावेत तीन फलंदाज माघारी, मॅक्सवेलही फेल
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/03/ff308870c3080cfa8c3f689d0f72602b1711118895888206_original.jpg)