Lok Sabha 2024 nagpur lok sabha constituency nitin gadkari Ready for election Celebrated Holi with voters maharashtra politics marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nagpur News नागपूर : एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Nagpur Lok Sabha Election) प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरीही (Nitin Gadkari) आजपासूनच धुळवडमध्ये सहभागी झाले आहेत. नागपूरात इतवारी किराणा मर्चंट असोसिएशनने आयोजित केलेल्या होलीमिलन कार्यक्रमात नितीन गडकरी मोठ्या उत्साहात सहभागी झालेत. यावेळी उपस्थितांना गडकरींनी गुलालाचा टीका लावत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नागपूर लोकसभेतील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या प्रचाराचा धडाका सुरु केलाय. या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात नितीन गडकरी यांनी शहरातील गणमान्य व्यक्ती, वेगवेगळ्या संघटना यांच्या भेटीगाठी सुरु केल्याय. आज नितीन गडकरी यांनी नागपूरच्या इतवारी किराणा मर्चंड असोशिएशन यांची मस्कासाथ मार्केटमध्ये आयोजित बैठकीला उपस्थिती दिली. या बैठकीत त्यांनी नागपूरच्या व्यापाऱ्यांच्या मागण्यानावर आपली भूमिका मंडली असून व्यापयारांच्या समस्यां जाणून घेतल्याय. 

नितीन गडकारींचा मतदारसंघात प्रचाराचा धडाका

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरातनं उमेदवारी मिळाली आहे. येत्या 27 मार्चला नितीन गडकरी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या करिता नागपूर भाजप आणि नितीन गडकरींच्या वतीने संविधान चौक से जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात अली असून या रॅलीच्या माध्यमातून नितीन गडकरी आपले शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. या करिता स्वत: नितीन गडकारींनी तमाम नागपूरकरांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

गडकरी विरोधात नेमकं उमेदवार कोण ? 

असे असताना गडकारींना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी आपल्या प्रचार प्रसार करण्यास सुरुवात केली आहे. आज नितीन गडकरी यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे नागपूरात भाजपकडून जोरदार तयारी सुरू असतानाच अद्याप महाविकस आघाडी तर्फे नितीन गडकरी विरोधात कोण उमेदवार असेल यावर अद्याप शिक्कामोर्तब झाला नसल्याने हा उमेदवार नेमका कोण असेल या बाबत साऱ्यांना उत्सुकता लागली आहे.    

नागपूर विभागात आठ नामनिर्देशनपत्र दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  पहिल्या टप्प्यासाठी  नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघापैकी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी तीन, रामटेकसाठी एक, भंडारा-गोंदियासाठी  दोन आणि गडचिरोली-चिमूरसाठी दोन नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. या पाचही मतदारसंघांमध्ये गेल्या तीन दिवसात 707 नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून नारायण चौधरी (सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया, कम्युनिस्ट), साहिल तुरकर (अपक्ष) आणि दीपक म्हस्के (बहुजन महापार्टी) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून प्रमोद खोब्रागडे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून हरिदास बारेकर (अपक्ष) आणि विनोद मडावी (बी.आर.एस.पी.) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुहास फुंडे (अपक्ष)  आणि आकाश जीभकाटे  (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या  दिवशी  एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts