Shrikant Shinde : ‘सुजयच्या नावातच जय, त्यामुळे सुजयचा विजय निश्चित’, श्रीकांत शिंदेंचे अहमदनगरमधून वक्तव्य

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shrikant Shinde : गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींच्या कामामुळे आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. लोकसभेची निवडणूक ही कोणत्या एका व्यक्तीची नाही ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. सुजयच्या नावातच जय आहे त्यामुळे सुजयचा विजय निश्चित आहे, असे वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

श्रीकांत शिंदे म्हणाले की, कोविडच्या नावाखाली हिंदू सणांवर बंदी घालण्याचे काम करण्यात आलं होतं. ज्या शिवतीर्थवर हिंदुहृदयसम्राट हिंदुत्ववाचे विचार मांडायचे त्याच शिवतीर्थवर काँग्रेसची यात्रा आली. सावकारांना शिव्या घालणाऱ्यांसोबत ‘ते’ गेले, असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला आहे. सुजय विखेंनी 10 हजार कोटींची काम या जिल्ह्यात केली. रिक्षा चालवणारा व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री झाला.  देशात 400 पारचा आकडा पार पाडायचा असेल तर सर्वांनी मतभेद बाजूला ठेवावे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

म्हणून नागरिकांनी आम्हाला साथ दिली – सुजय विखे

यावेळी सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) म्हणाले की, नगरची लोकसभा निवडणूक ही विचारांची निवडणूक आहे. भाजपचा उमेदवार मी तर फिक्स आहे, समोरचा उमेदवार अजून ठरेना. जिल्ह्यातील नागरिकांनी विखे कुटुंबातील चौथ्या पीडिला सत्तेत बसवलं, आमचं काहीतरी योगदान असेल म्हणून तर नागरिकांनी आम्हाला साथ दिली आहे. एखाद्या व्यक्तीला माझ्याबद्दल द्वेष असेल तर हरकत नाही, पण ही निवडणूक महायुतीची निवडणूक आहे. महायुतीची निवडणूक आहे असं समजून सर्वांनी एकजुटीने राहावं. एक सरपंच फोडायचा असेल तर सहा-सहा महिने घालवावी लागतात इथे एकनाथ शिंदेंमागे 40-40 आमदार जातात. काहीतरी विचार असेल म्हणून तर आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले असतील, असेही त्यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाले दादा भुसे? 

शिवसेना मेळाव्यात दादा भुसे म्हणाले की, “वर्षा” ची दार ही सर्वसामान्य जनेतेसाठी कायम खुली असतात. शेवटचा माणूस मुख्यमंत्री शिंदेंना भेटत नाही तोपर्यंत वर्षाची दार खुली असतात.नगर म्हंटले की आठवण येते अनिल भैय्याची. कदाचित अनिल भैया असते तर त्यांची साथ एकनाथ शिंदे यांच्या सोबतच राहिली असती. प्रत्येक घरात किंतु-परंतु असतात. मात्र महायुतीतील सर्वच पक्षांनी एकत्रित येऊन लोकसभेचे काम केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण एकजुटीने काम केलं पाहिजे.

आणखी वाचा 

तिकीटासाठी एकदाही मुंबई, दिल्लीला न जाता उमेदवारी; शाहू महाराजांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर संभाजीराजेंची खास पोस्ट

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts