BJP Seat Sharing Maharashtra loksabha election 2024 Marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BJP Seat Sharing : महायुतीचं जागावाटप आज फायनल होणार ?  भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतल्या उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई या दोन जागांसाठी आपले उमेदवार दुसऱ्याच यादीत जाहीर केले. पण अजूनही महायुतीचं घोडं मुंबईतल्या तीन आणि ठाण्याच्या एका जागेवर अडलेलं आहे. मुंबईतल्या दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी भाजप आग्रही आहे. पण मनसे महायुतीत दाखल झाली, तर मनसेनं दक्षिण मुंबई मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी मागणी केली आहे. मुंबईतला वायव्य मुंबई मतदारसंघ लढवण्यासाठी शिंदेंची शिवसेना इच्छुक आहे. पण या मतदारसंघावर भाजपनंही दावा केला आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपकडून नवा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे मतदारसंघावरही भाजपचा डोळा आहे.

[ad_2]

Related posts