सामना तर जिंकून दिला, पण Flying Kiss देणं पडलं महागात; केकेआरच्या गोलंदाजावर कारवाई
[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
KKR vs SRH: हेन्रींक क्लासेन याने धडाकेबाज अर्धशतकी खेळी सनरायजर्स केल्यानंतरही हैदराबादला आयपीएल-17 मध्ये शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून अवघ्या चार धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. कोलकाताने पहिली फलंदाजी करताना हैदराबादला 208 धावांचे लक्ष्य दिले.
हैदराबादने दिलेल्या धावांचे पाठलाग करताना हैदराबादचा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवाल याने आक्रमक सुरुवात केली, मात्र त्याला मोठी धावसंख्या करण्यात यश मिळाले नाही. केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने मयंकला झेलबाद केले. यावेळी विकेट्स घेतल्यानंतर हर्षित राणेने स्वत:वरील नियंत्रण गमावल्याचे पाहायला मिळाले.
मयंक अग्रवाल आणि अभिषेक शर्मा यांनी 5 षटकांत 58 धावा केल्या. केकेआरचे गोलंदाज सुरुवातील खूप दबावाखाली दिसले. पण हर्षित राणाविरुद्ध मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मयंक अग्रवाल सहाव्या षटकात बाद झाला. मयंकने टोलावलेला चेंडू थेट डीप स्क्वेअर लेगवर रिंकू सिंगच्या हातात गेला. मयंक बाद झाल्यानंतर हर्षित राणाने नियंत्रण गमावले. त्याने मयंकच्या समोर जाऊन फ्लाइंग किस दिला. मयंकला हे आवडले नाही. त्याने गोलंदाजाकडे एकटक पाहिलं. मात्र, शांत स्वभावाचा मयंक काहीच बोलला नाही आणि त्यामुळेच वाद वाढला नाही.
हर्षित राणाला ठोठावला दंड-
हर्षित राणाला त्याच्या संघाच्या इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये 23 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या एकूण 60 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. हर्षित राणाने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.5 अंतर्गत लेव्हल 1 चे दोन गुन्हे केले आहेत. त्याला संबंधित दोन गुन्ह्यांसाठी त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के आणि 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. हर्षित राणाने दोन गुन्ह्यांची कबुली दिली.
…अन् केकेआरचा विजय निश्चित झाला-
कोलकाताने दिलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या हैदराबाद संघाचे सलामीवीर मयंक अग्रवाल (32 धावा) व अभिषेक शर्मा (32 धावा) यांनी संघासाठी चांगली सुरुवात करुन दिली. मात्र मयंक आणि अभिषेक बाद झाल्यानंतर हैदराबादने ठरावीक अंतराने विकेट्स गमावल्या. हैदराबादची 5 विकेट्स वर 145 धावा असताना हेन्रींक क्लासेनने 29 चेंडूत 63 धावा केल्या. यामध्ये त्याने 8 षटकार लगावून हैदराबादला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र हर्षित राणाच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. कोलकाताकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरलेल्या सुयश शर्माने अप्रितिम झेल घेत क्लासेनला माघारी पाठवले आणि कोलकाताचा विजय निश्चित झाला.
[ad_2]
Related posts