Holika Dahan 2024 : करिअरमधील अडथळे, आयुष्यातील नकारात्मकता अशी करा दूर! होलिका दहनाच्या दिवशी करा हा उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Holika Dahan 2024 : फाल्गुन पौर्णिमेच्या तिथीला होलिका दहन म्हणजे होळी साजरी करण्यात येते. सर्वत्र होळीसाठी लगबग सुरु आहे. घरोघरी होलिका दहनाला नैवेद्य दाखवण्यासाठी पुरणपोळी होणार आहे. होळीचा हा सण नकारात्मक गोष्टींवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय आहे. होळीची वर्षांनुवर्ष आख्यायिका प्रसिद्ध आहे ती म्हणजे भक्त प्रल्हाद आणि होलिकाची कथा. होलिका दहनाच्या दिवशी शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील निगेव्हिटी दूर होऊन सर्वत्र फक्त आनंदच आनंद असेल. (Get rid of obstacles in career negativity in life Do this remedy on the day of Holika Dahan upay)

नकारात्मक आणि अडथळे दूर करण्यासाठी उपाय!

फाल्गुन महिन्यात जेव्हा सूर्य जो आत्माचा कारक आहे आणि चंद्र जो मनाचा कारक आहे, एक दुसऱ्या समोरासमोर असतात. तेव्हा विश्वात एक अद्भूत आणि शुभ अशी शक्तीचा वावर असतो. ही ऊर्जा असते चांगल्या गोष्टींची, चांगल्या बदलाची…हा तो दिवस असतो जेव्हा आपण होलिका दहन करतो. याचा अर्थ वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजयचा उत्सव. 

होलिका दहनाच्या दिवशी तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता, अडथळे, चुकीच्या सवयी, मत्सर (इगो) या सगळ्या गोष्टी होळीच्या पवित्र अग्नीच्या शक्तीत दहन करावं, असं अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय.

होलिका दहन उपाय!

होलिका दहनाची पूजा करण्यापूर्वी घरात एखाद्या शांत ठिकाणी बसा. तुमच्यासमोर शुद्ध तूपाचा दिवा किंवा मेणबत्ती लावा. आता एका कागदावर निळा किंवा हिरवा रंगाच्या पेनने घ्या. आता तुमच्या कुलदैवताचे ध्यान करा. तुमच्या आयुष्यात ज्यामुळे अडथळे, समस्या निर्माण होत आहेत. त्या सगळ्या गोष्टींला तुमच्या भाषेत लिहिण्यास सुरुवात करा.

तुमचं पत्र लिहून झाल्यानंतर खाली पूर्ण नाव लिहा आणि जन्मतारीख लिहिला. त्यासोबत तीन वेळा धन्यवाद लिहा. आता हे पत्र एका पाकिटात टाकून नीट बंद करा. 

आता होलिका दहनच्या पवित्र अग्नीत दहन करा. जर तुम्हाला होलिका दहनासाठी जाता येत नाही, तरतुम्ही जो दिवा किंवा मेणबत्ती तुम्ही लावली होती तिथे या पत्राला ज्वाळावं. त्याशिवाय होलिका दहनच्या रात्री तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर जेव्हा घरातील सर्व लोक घरात असतील तेव्हा गुलाल टाकून शुद्ध तूपाचा दिवा लावा. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts