Ravindra Dhangekar slams bjp Murlidhar Mohol allegation that tortured Girish Bapat benefited builder pune lok sabha election update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे: लोकसभेच्या रिंगणातील (Pune Lok Sabha Election)  महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ठरल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पुणेकर पाहात आहेत. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेताच भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुण्याचे महापौर असताना मोहोळ यांनी बापट साहेबांना (Girish Bapat) किती त्रास दिला हे सर्वांनाच माहिती आहे,  तसेच त्यांनी कोणत्य बिल्डरांना दूध पाजलं हेदेखील पुणेकरांना माहिती असल्याची टीका त्यांनी केली.

पुणे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. भाजपकडे पैलवान असेल तर आमच्याकडे वस्ताद आहे असा टोला धंगेकरांनी लगावला. तर पुण्यात पवारांच्या सहा सभा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

बापट साहेबांना मोहोळांनी त्रास दिला

बापट साहेबांना मुरलीधर मोहोळ यांनी किती त्रास दिला, त्यांना किती छळलं आहे सगळ्यांना माहिती असल्याचं रवींद्र धंगेकर म्हणाले. 

भाजपकडे पैलवान तर आमच्याकडे वस्ताद

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर रवींद्र धंगेकर म्हणाले की, आज होळी आहे, वाईट प्रवृत्ती यांचा नाश होवो. शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेतला. शेती ते आयटी पर्यंत शरद पवार यांचे काम आहे. शरद पवार यांना भेटून मार्गदर्शन घेतलं. निवडणुकीचे नियोजन, पक्षाच्या सभा या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन घेतलं. शरद पवार यांची पुण्यात सहा सभा होणार आहेत. 

पैलवान हा सगळ्यांचा असतो असं सांगत मुरलीधर मोहोळ यांनी कुठल्या पैलवानला दूध पाजले? त्यांनी बिल्डर लोकांना दूध पाजले असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला. ते म्हणाले की, हे क्षेत्र हे ‘जय बजरंगबली’चे क्षेत्र आहे. पैलवान हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो, तो सगळ्यांचाच असतो. मुरलीधर मोहोळ यांनी आतापर्यंत किती पैलवानांना दूध पाजलं ते सांगावं. मुरलीधर मोहोळ यांनी गोखले, व्यास यांना दूध पाजलं, त्यांनी बिल्डर लोकांना दूध पाजलं. त्यांनी आमच्या गरीब पैलवानांना अर्धा लिटरही दूध पाजलं नाही. आणि जर त्यांच्याकडे पैलवान असतील तर आमच्याकडे वस्ताद आहेत. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts