BCCI is thinking of increasing the salary of the cricketers who play Ranji cricket. A big decision is likely to be taken soon.

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BCCI On Ranji Cricket: गेल्या काही दिवसांआधीच बीसीसीआयने कसोटी क्रिकेटपटूंच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली होती.कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करीत बीसीसीआय सचिव जय शाह यांनी कसोटीपटूंचे सामना शुल्क 15 लाखांहून 45 लाख असे केले. यानंतर आता देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंसाठी मोठी माहिती समोर येत आहे. 

बीसीसीआय रणजी क्रिकेट खेळणाऱ्यांचा क्रिकेटपटूंचा पगार वाढवण्याचा विचार करत आहे. यावर लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय कसोटी क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी सतत काम करत आहे. याअंतर्गत रणजी करंडक क्रिकेटपटूंच्या पैशात वाढ करण्याच्या निर्णयाला लवकरच मंजुरी मिळू शकते.

रणजी करंडक क्रिकेटपटूंना किती पैसे मिळतात?

सध्या बीसीसीआय रणजी ट्रॉफी क्रिकेटपटूंना 40,000 ते 60,000 रुपये प्रतिदिन मॅच फी म्हणून देते. तथापि, हे सर्व हंगामात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांच्या संख्येवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर एखादा खेळाडू एका हंगामात सर्व सात गट खेळ खेळला तर त्या खेळाडूला वर्षाला सुमारे 11.2 लाख रुपये मिळतात. वास्तविक, आयपीएलमुळे अनेक मोठे खेळाडू रणजी करंडक खेळण्याचे टाळतात, परंतु आता बीसीसीआय आपल्या नव्या रणनीतीवर काम करत आहे.

अनेक क्रिकेटपटू रणजी क्रिकेट स्पर्धा खेळणं टाळतात-

आयपीएल 2024 साठी 156 भारतीय क्रिकेटपटूंना करारबद्ध करण्यात आले होते. ज्यामध्ये असे 56 खेळाडू होते ज्यांनी रणजी ट्रॉफीचा एकही सामना खेळला नाही. तर 25 खेळाडू होते ज्यांनी फक्त 1 सामना खेळला. मात्र, आता या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी बीसीसीआय एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. यावर लवकरच मोठा निर्णय होणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, रणजी करंडक क्रिकेटपटूंच्या पैशात वाढ करण्याचा निर्णय मंजूर झाल्यास त्याचा खेळाडूंवर कितपत परिणाम होईल हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. यानंतर मोठे भारतीय खेळाडू आयपीएलपेक्षा देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देतील का?, असा सवालही उपस्थित केला जात आहे. 

जय शाह यांनी काय घोषणा केली होती?

सत्रातील 50 टक्क्यांपेक्षा कमी (4 कसोटींहून कमी) सामने खेळले तर अंतिम संघ व राखीव खेळाडूंना प्रोत्साहन रक्कम मिळणार नाही. 50 टक्क्यांपेक्षा अधिक कसोटी सामने (5 ते 6) खेळणाऱ्या  अंतिम संघातील खेळाडूला 30 लाख रुपये प्रति सामना तर राखीव खेळाडूंना 15 लाख रुपये प्रति सामना प्रोत्साहन रक्कम मिळेल. 75  टक्क्यांपेक्षा अधिक कसोटी सामने (7 पेक्षा जास्त) खेळलेल्या अंतिम संघातील खेळाडूला 45 लाख रुपये प्रति सामना तर राखीव खेळाडूंना 22.5 लाख रुपये प्रति सामना प्रोत्साहन रक्कम दिली जाईल.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts