Stock Market bumper returns from share market Investment Tips in Marathi;शेअर मार्केटमधून बंपर रिटर्न हवेयत? ‘अशी’ करा गुंतवणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Share Market: अनेकांना शेअर मार्केटबद्दल फारशी माहिती नसते. पण त्यांना त्यात गुंतवणूक करुन चांगले रिटर्न्स हवे असतात. 
शेअर बाजारात गुंतवणूकीकडे तुम्ही दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याचा मार्ग म्हणून पाहू शकता. फक्त शेअर मार्केटमधून कमाई करून मोठा फंड तयार करणारे अनेकजण आहेत.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी? याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

डिमॅट खाते उघडा

गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डिमॅट खाते असायला हवे. त्यानंतर सर्वात आधी किती गुंतवणूक करु शकता आणि किती जोखीम घेऊ शकता याचे मुल्यांकन करा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक का करायची आहे? तुम्हाला दीर्घ मुदतीत पैसे कमवायचे आहेत की अल्पावधीत नफा कमवायचा आहे? तुम्ही किती धोका पत्करण्यास तयार आहात? हे प्रश्न तुम्ही स्वत:ला विचारा. यानंतर योग्य गुंतवणूक धोरण विकसित करण्यास तुम्हाला मदत होईल. 

फंड डायव्हर्सिफाइड

सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नये असे म्हणतात. म्हणजेच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविध स्टॉक्सचा समावेश करून तुम्ही जोखीम कमी करण्यात मदत करू शकता.

धीर धरा

शेअर बाजारात गुंतवणूक करुन चांगले रिटर्न्स मिळणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. एका रात्रीत पैसे मिळतील अशी अपेक्षा करू नका.

संशोधन करा

कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीबद्दल आलेल्या सर्व बातम्या वाचा. कंपनीची आर्थिक कामगिरी, उद्योगाची परिस्थिती आणि भविष्यातील संभावनांचे पुनरावलोकन करा.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची गुंतवणूक असते. शेअरच्या किमती वर-खाली होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही पैसे कमावता तसे गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुम्ही चांगला रिसर्च केला असेल आणि तुमची जोखीम ओळखून शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता. यामुळे तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होईल. 

कमी रक्कम गुंतवून करा सुरुवात

स्टॉक मार्केटमध्ये नवीन आलेल्यांनी 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करणे एक चांगला पर्याय असू शकतो. यामुळे तुम्हाला शेअर बाजाराविषयी जाणून घेण्याची आणि तुमची गुंतवणूक धोरण विकसित करण्याची संधी मिळेल. जसजसा तुम्हाला अधिक अनुभव मिळेल, तसतसे तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम वाढवू शकता.

Related posts