Nashik Latest News Girish Mahajan Criticizes Uddhav Thackeray After Meeting In Jalgaon Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नाशिक : उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्यावर सगळे लोक हसायला लागले असून त्यांच्या मागे कोणी नसल्याने ते अस्वस्थ आहेत. तसेच मनात येईल ते बोलत सुटलेत. का उद्धव ठाकरे यांच्याच मनात काही काळेभेर नाही ना? हे तपासून बघितलं पाहिजे. सतत बालिश वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करत आहेत. खरं तर उद्धव ठाकरे यांचीच चौकशी झाली पाहिजे, पोलिसांनी यांनाच ताब्यात घेऊन जाब विचारला पाहिजे, अशा शब्दांत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

नुकतीच उद्धव ठाकरे यांची जळगावमध्ये (Jalgaon) सभा पार पडली. या सभेत राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. त्याचबरोबर उद्धव ठाकरे म्हणाले की, राम मंदिरसाठी देशभरातून माणसे बोलवतील आणि परत जाताना गोध्रा घडवतील. जाळपोळ करतील, त्यावर आपली पोळी भाजतील. निवडणूक (Elections) आल्यावर घरांच्या होळ्या पेटतील आणि त्यांच्या ते पोळ्या भाजतील, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तरं दिले आहे. महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे अतिशय बालिश स्टेटमेंट करत आहे. त्यांच्या मनात काही काळभेर नाही ना? त्यांना तर असं काही करायचं नाही ना अशी शंका यायला लागली असून संजय राऊत हे लोकांना उकवायला लागले आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यांनाच काही घडून तर आणायचं नाही ना? यांची चौकशी झाली पाहिजे, पोलिसांनी यांनाच ताब्यात घेतलं पाहिजे, असेही महाजन म्हणाले. 

गिरीश महाजन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis यांच्याबद्दल ते शेलक्या भाषेत आणि खालच्या भाषेत बोलायला लागले. त्यांच्याकडे फक्त दोन-चार लोक राहिले आहेत, तो विषय वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल उद्धव ठाकरे बोलत होते, तेव्हा त्यांची मला कीव येत होती. फस्ट्रेशन आल्यानं ते असं बोलत आहे, त्यांच्या मागे कोणी राहिलं नाही, म्हणून ते अस्वस्थ असून आम्हाला त्यांच शारीरिक व्यंग काढायचं नाही. पंतप्रधान यांच्यावर त्यांनी काय बोलावं? त्यांचेच पंतप्रधान होण्याबाबत बॅनर लागले. विरोधी पक्षात आहे, म्हणून त्यांना बोलावं लागतं, पण त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल का? विश्वासार्हता असायला पाहिजे? शिवाय मुख्यमंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले? असे अनेक प्रश्न महाजन यांनी अप्रत्यक्ष उद्धव ठाकरेंवर उपस्थित केले. 

सामना पेपर आता पुसायच्या कामाचा…. 

तसेच उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP) आणि शिवसेनेबाबत (Shivsena) वक्तव्य केले. यावर महाजन म्हणाले की, 25 वर्षे यांनी काय, बाळासाहेबांनी कमळाबाईची पालखी वाहिली का? तुमची स्वतःची पालखी वाहण्यासाठी तुम्हाला चार भोये सुद्धा मिळत नाही. 90 टक्के शिवसेना आमच्यासोबत आहे, त्यामुळे ते काय बोलत आहे, काही कळत नाही. कालच्या भाषेवरून मला वाटलं, त्यांची मनस्थिती चांगली नाही. आमच्याकडे बोलण्यासाठी दहा गोष्टी आम्ही बोलू शकतो. शारीरिक व्यंगावर, हा असा दिसतो, तो तसा दिसतो, आम्हीही बोलू शकतो. पण मर्यादा सोडत नसल्याचे महाजन म्हणाले. तसेच सामना पेपर हा फक्त आता पुसायच्या कामाचा राहिला आहे, त्याला महत्त्व देऊ नका. 48 पैकी एक खासदार निवडून आणून दाखवा. संजय राऊत यांनी सुरक्षित मतदार संघ शोधून निवडून येऊन दाखवावे, असे थेट आवाहन महाजन यांनी दिले. 

इतर महत्वाची बातमी : 

[ad_2]

Related posts