baramati young boy died in hospital who was beaten up

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : सध्याच्या लोकसभा निवडणुकीत बारामती (Baramati) हे शहर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. असे असतानाच या शहरातील मुख्य चौकात एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. 17 मार्च रोजी ही घटना घडली होती. विशेष म्हणजे ही मारहाण एवढी अमानुष होती, की या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी (Baramati Police) या घटनेनंतर गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.

चायनीज फूड स्टॉलवर आल्यानंतर अचानकपणे हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत धोत्रे (वय 22 वर्षे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा युवक बारामती शहरातील मुख्य चौकात असलेल्या एका चायनीज फूड स्टॉलवर आला होता. यावेळी अचानकपणे या युवकारी सहा जणांनी हल्ला केला. या युवकाला लाठ्या-काठ्यां तसेच लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आली.

बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल, पण मृत्यू 

या हल्यात अनिकेत नावाचा हा तरुण जबर दजखमी झाला. घटनेनंतर या जखमी तरुणाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रमाापेक्षा अधिक मारहाण झाल्यामुळे त्याचा उपचारादम्याम मृत्यू झाला. या मृत्यूमुळे अनिकेतच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. 

गुन्हा दाखल, तपास चालू 

बेशुद्धावस्थेत असताना या युवकाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 24 मार्च रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेसंदर्भात बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पूर्व वैमन्यासातून ही घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

हेही वाचा >>

Vijay Shivtare : 12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरून बारा वाजवणार! बारामतीसाठी शिवतारे ठाम, अजितदादांना घाम!

Gondia Crime News : बोगस डॉक्टरांचा बोगस दवाखाना! कोणतीही पदवी नसताना करायचा नको ते काम

Solapur Crime News : शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानं महिलेकडून तरुणावर टोकाचं पाऊल; बार्शीतील धक्कादायक घटना

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts