Rajasthan Royals Won by 20 Run KL Rahul Nicholas Pooran IPL 2024 RR vs LSG LIVE Score Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2024 RR vs LSG LIVE Score Updates: संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वातील राजस्थान (RR) संघानं यंदाच्या हंगामाची सुरुवात विजयानं केली आहे. राजस्थान संघाने लखनौचा (LSG) 20 धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा संघ 173 धावांपर्यंत मजल मारु शकला. लखनौकडून निकोलस पूरन आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी अर्धशतकं ठोकली, पण ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. 

राजस्थानची खराब सुरुवात – 

राजस्थाननं दिलेल्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या 11 धावांवर लखनौनं आघाडीचे तीन फलंदाज गमावले होते. क्विंटन डी कॉक फक्त चार धावा काढून तंबूत परतला. देवदत्त पडिक्कल याला खातेही उघडता आले नाही.. आयुष बडोनी फक्त एक धाव काढून बाद झाला. 3.1 षटकात 11 धावांमध्ये लखनौनं महत्वाच्या तीन फलंदाजांना गमवालं होतं. 

केएल राहुलने डाव सावरला – 

आघाडीची फळी कोसळल्यानंतर कर्णधार केएल राहुल यानं लखनौचा डाव सावरला. राहुल यानं फटकेबाजी करत लखनौच्या आशा जिवंत ठेवल्या. केएल राहुल यानं 58 धावांची खेळी केली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. केएल राहुल यानं 44 चेंडूमध्ये दोन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 58 धावांचे योगदान दिलं. केएल राहुल यानं दीपक हुड्डाच्या साथीनं डाव सावरला. दोघांनी 26 चेंडूमध्ये 49 धावांची महत्वाची भागिदारी केली. पण मोक्याच्यी क्षणी दीपक हुड्डा बाद झाला. दीपक हुड्डा यानं 13 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान दिलं. यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांचा पाऊस पाडला. 

निकोलस पूरन याची फटकेबाजी – 

दीपक हुड्डा बाद झाल्यानंतर निकोलस पूरन यानं आक्रमक रुप घेतलं. पूरन यानं राजस्थानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पूरन आणि केएल राहुल यांनी लखनौला विजयाच्या आशा जिवंत केल्या. पण राहुल बाद झाल्यानंतर लखनौची अवस्था अधिक बिकट झाली. केएल राहुल आणि निकोलस पूरन यांनी 52 चेंडूमध्ये झटपट 85 धावांची भागिदारी केली. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. निकोलस पूरन यानं आक्रमक खेळी करत धावांचा पाऊस पाडला पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. केएल राहुल बाद झाल्यानंतर मार्कस स्टॉयनिसही झटपट तंबूत परतला. स्टॉयनिस फक्त तीन धावांवर अश्विनच्या चेंडूवर बाद झाला. अखेरीस निकोलस पूरन यानं क्रृणाल पांड्याच्या साथीनं किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. पण राजस्थानने बाजी मारली. निकोलस पूरन अखेरपर्यंत लढला, पण इतरांकडून हवीतशी साथ न मिळाल्यामुळे लखनौला पराभवाचा सामना करावा लागला. निकोलस पूरन यानं 41 चेंडूमध्ये नाबाद 64 धावांची खेळी केली.  यामध्ये चार षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. क्रृणाल पांड्या चार धावांवर नाबाद राहिला. 

राजस्थानची गोलंदाजी कशी राहिली ?

ट्रेंट बोल्ट सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं राजस्थानच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याशिवाय नांद्रे बर्गर, आर. अश्विन, युजवेंद्र चहल आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. आवेश खान याला विकेट मिळाली नाही. 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts