GT vs MI IPL 2024 Who is Naman Dhir making his debut for Mumbai Indians vs Gujarat Titans Suryakumar yadav

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Who is Naman Dhir : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium in Ahmedabad) गुजरात आणि मुंबईमध्ये (GT vs Mi) सामना सुरु आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सुरुवातीच्या सामन्याला मुकणार आहे. मुंबई इंडियन्सनं सूर्यकुमार यादवच्या जाही नमन धीर (Naman Dhir) याला स्थान दिलेय. नमन धीर आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातोय. तो मधल्या फळीतील दर्जेदार फलंदाज आहे. सूर्याच्या जागी संधी देण्यात आलेला हा नमन धीर नेमका आहे तरी कोण? Who is Naman Dhir

24 वर्षीय नमन धीर हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळतो. तो एक विस्फोटक फलंदाज आहे. मुंबई इंडियन्ससाठी त्यानं यंदाच्या हंगामात पदार्पण केले आहे. नमन धीर याला सूर्यकुमार यादवच्या जागी प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले आहे. नमन धीरच्या क्षमतांचा अंदाज अद्याप क्रिकेटला आलेला नाही. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 2023 च्या रणजी ट्रॉफीत आठ सामन्यांमध्ये दोन शतके (सौराष्ट्रविरूद्ध 131, गुजरातविरूद्ध 134) केली आहेत. मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये तो एक शानदार फिनिशर आहे. तो डेथ ओव्हर्समध्ये फलंदाजी करतो, सामने संपवतो आणि त्याने हेच पंजाबसाठीच्या पहिल्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफी विजयात केले आहे. तो एमआयमध्ये एक प्रतिष्ठित मधल्या फळीतला फलंदाज म्हणून येतोय आणि त्याच्याकडे पराभवाच्या खाईतून विजय मिळवण्याची क्षमता आहे. 

नमन धीरचं करियर – 

अष्टपैलू नमन धीर हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब संघाचा सदस्य आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यानं 14 सामन्यातील 20 डावात 574 धावा ठोकल्या आहेत.  यामध्ये त्यानं दोन शतकं आणि दोन अर्धशतकं ठोकली आहेत. नमन धीर यानं 59 चौकार ठोकले आहेत, तर 18 गगनचुंबी षटकारही लगावले आहेत. त्याशिवाय फिल्डिंग करताना 13 झेल घेतले आहेत.  नमन धीर यानं  चार देशांतर्गत टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला फक्त 39 धावा काढता आल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 3  षटकार आणि एक चौकार लगावला आहे. टी20 सामन्यात त्यानं अद्याप गोलंदाजी केलेली नाही. पण फस्ट क्लास क्रिकेटमध्ये 11 डावात त्यानं गोलंदाजी केली. यामध्ये त्यानं 8 विकेट घेतल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 13 डिसेंबर 2022 रोजी त्यानं पदार्पण केलेय. 

20 लाख रुपयांमध्ये मुंबईच्या ताफ्यात – 

नमन धीर याचा जन्म 31 डिसेंबर 1999 रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला. तो पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. मुंबईने त्याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केले होते. फिनिशर म्हणून नमन धीर याला ओळखलं जाते. नमन धीर याला आक्रमक फलंदाजीसाठी ओळखलं जातं. त्यानं 2023 मध्ये शेर पंजाब टी 20 चषकात धावांचा पाऊस पाडला होता. त्यानं 193 च्या स्ट्राईक रेटने धावा वसूल केल्या होत्या. स्पर्धेत त्यानं 30 षटकार ठोकले होते. 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts