lok sabha 2024 ias officers appointment in his home district controversy Police Protection to Complainant order by Election Commission to Buldhana Police maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Buldhana News: आयएएस (IAS) अधिकाऱ्याच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्या प्रकरणी अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा (Buldhana) येथे उघडकीस आला होता. अशातच या प्रकरणाची दखल आता निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतली असून राज्यात आचारसंहिता लागू असेपर्यंत आझाद हिंद शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सतीश रोठे यांना पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने पोलिसांना दिला आहेत. त्यामुळे आता बुलढाणा पोलीस (Buldhana Police) या प्रकरणी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

आचारसंहिता असेपर्यंत तक्रारकर्त्याला पोलीस संरक्षण 

देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आयएएस (IAS) अधिकाऱ्याची नियुक्ती त्याच्या स्वतःच्याच जिल्ह्यात केल्याने हा प्रकारे म्हणजे नियमांचा भंग असून या नियुक्तीमुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांवर याचा प्रभाव पडू शकतो. असे असतांना बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असलेले आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांची सरकार ने त्याच्या स्वतःच्याच जिल्ह्यात नियुक्ती केली होती. त्यामुळे या विरोधात आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश रोठे यांनी आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत 48 तासाच्या आत आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांची धुळे येथे बदली केली. 

मात्र, ही तक्रार केल्यामुळे आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांची तडकाफडकी बदली झाल्याने संतापलेल्या नरवाडे यांच्या समर्थक आणि नातेवाईकांनी ऍड. सतीश रोठे यांच्या कार्यालयासमोर जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर रोठे यांनी बुलढाणा पोलीस स्टेशन गाठत या प्रकरणाची तक्रार दिली होती. त्या नंतर आता या प्रकरणाची दखल घेत आता निवडणूक आयोगाने पत्र देऊन एड. सतीश रोठे यांना आचारसंहिता लागू असेपर्यंत संरक्षण देण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत. आता पोलीस यावर काय भूमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सक्त नियम असूनही नियुक्ती

बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावचे रहिवासी असलेले आयएएस अधिकारी विशाल नरवाडे हे 2020 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मात्र एन निवडणुकीच्या काळात आयएएस विशाल नरवाडे यांची बदली बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली. खरंतर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात निवडणूक काळात नियुक्ती देण्यात येत नसते. असा सक्त नियम असूनही विशाल नरवाडे यांची नियुक्ती निवडणुकीच्या तोंडावरच देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटल होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts