रक्षा खडसे म्हणाल्या, वेळ आली तर एकनाथ खडसेंकडे मत मागणार, रोहिणी खडसेंनी दिलं सडेतोड उत्तर!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raver Lok Saha Election : रावेर लोकसभा मतदारसंघातून (Raver Lok Sabha Constituency) भाजपने पुन्हा एकदा रक्षा खडसेंना (Raksha Khadse) उमेदवारी दिली आहे. यावरून जळगावचे वातावरण तापले आहे. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे असूद्या किंवा स्मिता वाघ यांनी माझे पाय धरले तर माझे आशीर्वाद त्यांच्यासोबत असतील असे वक्तव्य केले. यावर रक्षा खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

रक्षा खडसे म्हणाल्या की, निवडणूक येते तेव्हा आपण विरोध पक्षाच्या नेत्यांच्या घरी जातो. त्यांचे आशीर्वाद घेतो. कार्यकर्त्यांनाही विनंती करतो. एकनाथ खडसेंनी बऱ्याच वर्षांपासून भाजपचे काम केले आहे. ते वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे त्यांचा सगळ्यांशी चांगलाच परिचय आहे. राजकारणात आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी घरात आम्ही कधीही पक्षाचे विषय काढत नाहीत. माझ्या मुलांचे एकनाथ खडसे आजोबा आहेत,परिवार परिवाराच्या जागी आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी कधीही माझ्या राजकारणात कधीही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे मी एकनाथ खडसे यांच्याकडे हक्काने मत मागणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

रोहिणी खडसेंचे रक्षा खडसेंना उत्तर 

यावर रोहिणी खडसे (Rohini Khadse) म्हणाल्या की, लोकशाही आहे, लोकशाहीत आपण विरोधकांकडे जाऊनही मत मागतोच ना. आपल्या विरोधातील उमेदवार समोरासमोर आल्यावर आपण म्हणतोच ना, माझ्याकडे लक्ष ठेवा. त्यामुळे लोकशाहीत प्रत्येकाला मत मागण्याचा अधिकार आहेच, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

याबाबत बोलू शकत नाही – रोहिणी खडसे

दरम्यान, रक्षा खडसे यांची कार्यकर्त्यांसोबत खडाजंगी झाल्याबाबत रोहिणी खडसे यांना विचारले असता त्या म्हणल्या की, सोशल मीडियात क्लिप व्हायरल झाल्याचे आपण ऐकले असले तरी आपण ती क्लीप पाहिलेली नाही. त्यामुळे याबाबत आपण बोलू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

रावेरच्या उमेदवाराबाबत दोन-तीन दिवसात घोषणा

दरम्यान, रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. ही जागा शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. यावर रोहिणी खडसे म्हणाल्या की, राष्ट्रवादी पक्षाला उमेदवार देऊ शकलो नाही असे नाही. इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा सुरू असून त्यातून योग्य उमेदवार शोधला जाईल आणि येत्या दोन-तीन दिवसात उमेदवाराची घोषणा करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

Rohini Khadse : बारामतीनंतर आता रावेरमध्येही रंगणार नणंद-भावजय लढत? शरद पवारांकडून रोहिणी खडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता

Ajit Pawar PC : महादेव जानकरांना पाठिंबा देतोय ही केवळ अफवा, कोणत्याही परिस्थितीत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही; अजित पवारांचे एक घाव दोन तुकडे

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts