ipl 2024 suryakumar yadav to miss mis vs srh match due not get clearance from nca

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आयपीएलमध्ये पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध पार पडला. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्सला दरवर्षीप्रमाणं आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सचा गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये 6 धावांनी पराभव झाला. मुंबईला त्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवची कमी जाणवली. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुखापतग्रस्त असल्यानं आयपीएलचा पहिला सामना खेळू शकला नव्हता. सूर्यकुमार यादव दुसऱ्या मॅचमध्ये देखील खेळू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे. 

बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीनं सूर्यकुमार यादवला दुसऱ्या मॅचसाठी देखील फिटनेस प्रमाणपत्र दिलेलं नाही.गुजरात टायटन्स  विरुद्धच्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्सला हैदराबाद विरोधातील मॅचपूर्वी मोठा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादव उद्या होणाऱ्या मॅचमध्ये देखील खेळू शकणार नाही हा मुंबईसाठी मोठा धक्का मानला जात आहे.स्पोर्टस तक च्या बातमीनुसार सूर्यकुमार यादवची दुसरी फिटनेस टेस्ट करण्यात आली. सूर्यकुमार यादवला नॅशनल क्रिकेट अकादमीकडून क्लिन चीट मिळालेली नाही. सूर्यकुमार यादवची फिटनेस टेस्ट 21 मार्चला करण्यात आली होती. सूर्यकुमार यादवच्या तंदुरुस्तीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून तयारी सुरु करण्यात आली होती. मात्र, सूर्यकुमारला अद्याप फिटनेस क्लिअरन्स प्रमाणपत्र मिळालेलं नाही. 

जून महिन्यात टी-20 वर्ल्डकप सुरु होणार आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मधील भारताचा आघाडीचा फलंदाज असल्यानं त्याच्या फिटनेसबाबत बीसीसीआय धोका पत्कारण्याच्या मनस्थितीत नाही.त्यामुळं कोणतीही घाई न करता सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबाबत काळजी घेतली जात आहे. सूर्यकुमार यादव काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना दुखापतग्रस्त झाला होता. सूर्यकुमार यादवला हर्नियाचा त्रास असल्याचं सांगण्यात आलं होतं. सूर्यकुमार यादवनं जर्मनीला जाऊन जानेवारी महिन्यात उपचार घेतले होते. यानंतर एका महिन्यात तो फिट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, अजून सूर्यकुमार यादव फिट नसल्याचं समोर आलं आहे.   

उद्या मुंबई विरुद्ध हैदराबाद लढत

मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात हैदराबादमध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. उद्याच्या मॅचमध्ये मुंबई आणि हैदराबादच्या टीमचा विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल. सूर्यकुमार यादवनं फिट नसल्यानं मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. आता मुंबई इंडियन्स सनरायजर्स हैरदाबाद विरोधात कोणत्या खेळाडूला संधी देणार हे पाहावं लागेल. सूर्यकुमार यादव टी-20 मधील आक्रमक खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. 

संबंधित बातम्या :

Virat Kohli : जिथ कोणी ओळखत नव्हतं, क्रिकेटपासून ब्रेक घेतल्यानंतर काय केलं, विराट कोहलीनं सगळं सांगितलं

Hardik Pandya : तो निर्णय सर्वांनी मिळून घेतलेला, हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ मुंबईचे बॅटिंग कोच मैदानात, टीकाकारांना सुनावलं

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts