Weather Update Today Rain Prediction Maharashtra vidarbha IMD Weather Forecast marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Weather Update : एकीकडे उन्हाच्या  झळा पाहायला मिळत असताना दुसरीकडे काही भागात पावसाची रिमझिम (Unseasonal Rain) पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांत राज्यासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

उत्तर आणि पूर्व भारतातील काही भागात वादळी वारा आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशातील हवामानत बदल होताना पाहायला मिळत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. राज्यात नागपूर, लातूरसह विदर्भात पावसाची रिमझिम सुरु होती.

31 मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज कायम

अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात जोरदार पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये 30 मार्चपासून जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. 27 मार्च ते 31 मार्च या दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर – पूर्व भारतातील काही भागात वादळी वारा आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता

विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत राज्यातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत राज्यातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 

पुणे, मुंबईसह ठाण्यात उन्हाच्या झळा वाढल्या

पुण्यात मंगळवारी 18.6 अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं. अकोल्यात 41 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. मुंबई आणि ठाण्यात सध्या उन्हाच्या झळा बसत आहे. मुंबईत दिवसा कोरडं वातावरण पाहायला मिळत असून तापमानात हळूहळू वाढ होताना पाहायला मिळत आहे. मार्च महिन्याच्या शेवटी मुंबईतील तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts