[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : सध्याच्या घडीला प्ले ऑफचे समीकरण हे चांगलेच रंजकदार होत चालले आहे. पण त्यामध्ये आता मुंबई इंडियन्सचा संघ अडकल्याचे पाहायला मिळत आहे. कारण लखनौविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी करो या मरो असाच असणार आहे. पण जर लखनौच्या सामन्यात मुंबईचचा पराभव झाला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येणार का, याचे समीकरण आता समोर आले आहे.लखनौच्या मॅचपूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ हा १२ सामने खेळला आहे. या १२ सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाने सात सामने जिंकले आहेत, तर त्यांना पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे सात विजयांसह मुंबईच्या संघाचे आता १४ गुण झाले आहेत आणि त्यामुळे ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. लखनौच्या सामन्यात जर त्यांना विजय मिळाला तर त्यांचे १६ गुण होतील आणि ते दुसऱ्या स्थानावर पोहोचतील. पण १६ गुणांनंतर मुंबईचा संघ हा प्ले ऑफच्या दिशेने ठोस पाऊल टाकू शकतो, पण प्ले ऑफमधील त्यांचे स्थान निश्चित होणार नाही. पण जर त्यांचा या सामन्यात पराभव झाला. तर मात्र त्यांचे आव्हान संपुष्टात येण्याची भिती आहे. कारण या सामन्यात जर त्यांचा पराभव झाला तर यानंतर त्यांच्या हातात फक्त एकच सामना राहणार आहे. या सामन्यात जरी त्यांनी विजय मिळवला तरी त्यांचे १६ गुण होतील आणि १६ गुणांसह ते निश्चितपणे प्ले ऑफमध्ये जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे मुंबईसाठी हा करो या मरो असाच सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबईच्या संघाला विजय मिळवावा लागेल. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईला विजय मिळवता येतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
गुणतालिकेत सध्याच्या घडीला फार मजेशीर गोष्टी पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला फक्त गुजरातचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. तर दिल्ली आणि हैदराबाद हे संघ स्पर्धेच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे अन्य सात संघांपैकी कोण प्ले ऑफमध्ये जाणार, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.
[ad_2]