[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Indians In Abroad: भारतीय लोक जगभरात एवढ्या संख्येने पसरले आहेत की प्रत्येक देशामध्ये एक भारत वसल्याचं गमतीनं म्हटलं जातंय. जगात असा एकही देश नाही त्या ठिकाणी भारतीय वंशाचे लोक मिळणार नाहीत. शिक्षण, नोकरी यासोबत स्थायिक होण्याच्या निमित्ताने जगभरात भारतीय वसले आहेत. जगभरातल्या उपलब्ध संधींचा भारतीयांनी फायदा घेतला आणि त्या त्या ठिकाणी जाऊन प्रगती केली.
परदेशामध्ये काही देश असे आहेत की भारतीय त्या देशाला प्राधान्य देतात, मग ते शिक्षणासाठी असो वा नोकरीसाठी. त्यामध्ये दोन प्रकारच्या भारतीयांचा समावेश होतो, त्यामध्ये एनआरआय (NRI) आणि पीआयओ (PIO)चा समावेश होतो.
परदेशात किती भारतीय आहेत?
परराष्ट्र मंत्र्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार परदेशात 1,34,59,195 एनआरआय ( NRI) राहतात. या व्यतिरिक्त 1,86,83,645 पीआयओ (PIO) म्हणजेच भारतीय वंशाचे लोक राहतात. जर आपण संपूर्ण आकडेवारी पहिली तर एनआरआय आणि पीआयओ मिळून तब्बल तीन कोटींहून अधिक लोक परदेशात राहतात.
कोणत्या देशात आहेत सर्वात जास्त भारतीय लोक?
नवनव्या संधींमुळे भारतातून परदेशात जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. अशातच त्यांना नेमका कोणता देश राहण्याच्या दृष्टीने सोयीस्कर आहे हे जाऊन घेऊ. भारतीयांची सर्वाधिक पसंती ही अमेरिकेला आहे. त्या देशात सर्वात जास्त भारतीय राहतात. त्यानंतर यूएईचा नंबर लागतो.
Reels
सध्या अमेरिकेत 44 लाख 60 हजार भारतीय राहत आहेत आणि यामध्ये 12 लाख एनआरआय आणि 31 लाख पीआयओ आहेत. यानंतर नंबर येतो तो यूएईचा, ज्याठिकाणी 34,25,144 भारतीय आहेत. यामध्ये 34,19,875 एनआरआय आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे सौदी अरेबिया. त्या देशात 25,94,947 भारतीय असून 25,92,166 एनआरआय आहेत.
अजून कोणत्या ठिकाणी राहतात सर्वाधिक भारतीय?
- म्यानमार- 20,09,207 भारतीय
- ब्रिटन- 17,64,000 भारतीय
- कॅनाडा- 16,89,055 भारतीय
- श्रीलंका- 16,14,000 भारतीय
- साउथ आफ्रीका- 15,60,000 भारतीय
- कुवैत- 10,29,861 भारतीय
- मॉरिशियस- 8,94,500 भारतीय
- कतार- 7,46,550 भारतीय
- नेपाळ- 6,00,000 भारतीय
- ऑस्ट्रेलिया- 2,41,000 भारतीय
- बहारीन- 3,26,658 भारतीय
अनिवासी भारतीयांचे (NRI) भारतात पैसे पाठवण्याचं योगदान मोठं आहे. 2022 या वर्षाभरात परदेशात राहणारे म्हणजेच अनिवासी भारतीयांनी देशात पाठवलेले पैसे सुमारे 100 अब्ज डॉलर्स असून ते एका वर्षात 12 टक्क्यांनी वाढले आहेत. जगभरातील माहिती तंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल्स, सेमीकंडक्टर डिझायनिंग, फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग आणि इतर क्षेत्रात भारतीयांनी वर्चस्व मिळवल्याचं दिसून येतंय.
ही बातमी वाचा:
[ad_2]