Ajit Pawar arrange Pailwan melava In pune on baramati loksabha constituency campaign planning maharashtra political News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पैलवानांची मदत आम्हाला पुणे जिल्ह्यातील(Pune Lok Sabha Constituency) चार ही लोकसभेत हवी आहे. मी काय फक्त बारामती, बारामती (Baramati Loksabha Constituency) करायला आलेलो नाही. मी कोणत्याही (Political News) स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेलं नाही. शिरूर (shirur Loksabha Constituency), मावळ(Maval Loksabha Constituency), पुणे आणि बारामती अशा चार ही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे, असा दंड उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पुणे जिल्ह्यातील पैलवानांच्या मेळाव्यात थोपटला आहे. अजित पवारांनी आज पुण्यात नामांकित वस्ताद आणि कुस्तीगीरांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. यावेळी संबोधित करताना अजित पवारांनी पैलवानांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.  

अजित पवार काय म्हणाले?

मला बारामती लोकसभेतील पैलवानांची मदत घ्यायची आहे, असं मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. त्यासाठी आपण आज वस्ताद आणि पैलवानांचा मेळावा आयोजित केला आहे. पैलवानांचा मोठा वारसा आपल्या राज्याला लाभलेला आहे. महाराष्ट्र केसरीच्या पातळीवर आपण हे अनुभवतो. कुस्तीच्या महासंघातील वादाचे पडसाद गल्ली ते दिल्लीपर्यंत पाहायला मिळाले. हे वाद आपल्याला मिटवायचे आहेत. त्यासाठीच आज आपण हितगुज साधत आहोत. पण मी काय फक्त बारामती, बारामती करायला आलेलो नाही. मी कोणत्याही स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेलं नाही. शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती अशा चार ही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे, असं ते म्हणाले. 

मुरलीधर मोहोळ निवडून येतील; अजित पवारांचा विश्वास

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही साधुसंत नाही. आम्ही राजकीय नेते आहोत. तुमच्या सहकार्याने आम्ही सरकार चालवतो. पैलवानांना ही प्रतिनिधित्व करता यावं, यासाठी आपण पुणे लोकसभेत मुरलीधर मोहोळांना उमेदवारी दिलेली आहे. तुमच्यातील एक सहकारी मुरलीधर मोहोळांच्या रूपाने लोकसभेत जाणार आहे. एकंदरीत कल पाहता मोहोळ मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, यात कोणतीही अडचण वाटत नाही.

तुमचं अमुल्य मत आम्हाला द्या- अजित पवार 

यंदा प्रत्येकाने मतदान करा, तुमचं आमुल्य मत महायुतीच्या उमेदवारालाच द्या,अशी विनंती अजित पवारांनी उपस्थितांना केली. कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि येत्या काळाज प्रत्येक खेळाडूला आम्ही हवी ती महत करु, असं आश्वासनही अजित पवारांनी खेळाडूंना दिलं आहे. 

इतप महत्वाची बातमी-

Pune Vasant More : एकीकडे उमेदवारीची चर्चा; दुसरीकडे मराठा समाजाच्या बैठकीतून वसंत मोरे तडकाफडकी निघून गेले; पुण्यात नेमकं काय घडलं?

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts