Eknath Shinde Group and Ajit Pawar Group dispute over Nashik Lok Sabha constituency Sanjay Shirsat warning to Chhagan Bhujbal Lok Sabha Election 2024 marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha Election 2024 : एकीकडे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती समोर येत आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने (Shiv Sena Shinde Group) आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाची (Nashik Lok Sabha Constituency) जागा सोडणार नाही, कोणाची मर्जी राखावी म्हणून जागेची अदलाबदल होत नाही. तीन टर्मचा आमचा खासदार असताना नाशिकची जागा सोडणं अशक्य, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, आता शिंदेसेना देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. एकीकडे शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे मुंबईकडे निघाले आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी देखील नाशिकची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. मागील तीन लोकसभा निवडणुकीत सतत आमच्या पक्षाचा खासदार नाशिकमधून निवडून येत असताना जी जागा मित्र पक्षाला सोडणे अशक्य असल्याचे शिरसाट म्हणाले आहेत. त्यामुळे महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघावरून तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

हेमंत गोडसे पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला…

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे आपल्या समर्थकांसह मुबंईच्या दिशेनं रवाना होत आहे.  नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीकडून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा झाल्यानं शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. याच  असवस्थेतून शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना होणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच हेमंत गोडसे यांनी समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. 

मी देशात राहायला इच्छुक आहे : भुजबळ

दरम्यान यावर छगन  यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. “नाशिक जागा लढवायची की नाही असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आपण निवडणूक लढवली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. चाचपणी केली म्हणून म्हटल लढायला पाहिजे. तर, नाशिकची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढवली जाणार आहे. तर, तुम्ही केंद्रात जायला इच्छुक आहे का?, यावर बोलतांना भुजबळ म्हणाले, मी देशात राहायला इच्छुक आहे. माझ्या नावाची चर्चा होती, त्यावर अजून काही ठरलं नाही, असे भुजबळ म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

मोठी बातमी : नाशिकमध्ये शिवसेना-भाजपच्या भांडणात राष्ट्रवादीचा लाभ, छगन भुजबळांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts