Pune crime news Suspended for a blood swap nurse Preeti Thokal and Shantha Makalur

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातील औंध रुग्णालयातील भोंगळ (Aundh Hospital Aundha Pune) कारभार समोर  (Pune Crime news) आला आहे. दोन रुग्णांच्या रक्टगटाची अदलाबदली झाल्याचा प्रकार समोर आला होता.  हा प्रकार पाहून आमदार अश्विनी जगताप यांनी औंध रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारीकांना चांगलंच खडसावलं होतं. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि त्यांनी थेट दोन परिसचारिकांचं निलंबन करण्यात आलं आहे. परिचारिकांकडून रक्त पिशव्यांची अदलाबदली झाली होती. त्यानंतर प्रकरणाची चौकशी केली. त्यानुसार निलंबन करण्यात आलं. 

प्रिती ठोकळ आणि शांता मकलूर, असं दोन अधिपरिचारिकांचं नाव आहे. परिचारिकेच्या चुकीमुळे दोन रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले. रुग्णांची प्रकृती अधिक खालावली होती. अखेर ही बाब चिंचवडच्या आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप यांना समजताच त्यांनी औंध जिल्हा रुग्णालय गाठून घटनेची माहिती घेत हलगर्जीपणा करणाऱ्या परिचारिका आणि डॉक्टरांना खडसावले आणि कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. परिचारिकेने रुग्णांना ‘ए’ ऐवजी ‘बी’ आणि ‘बी’ ऐवजी ‘ए’ रक्त चढवण्यात आले होते.

हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आमदार अश्विनी जगताप यांनी थेट औंध रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली होती. त्यांच्या नातेवाईकांकडून संपूर्ण प्रकार जाणून घेतल्यानंर थेट डॉक्टर आणि परिचारिकांना धारेवर धरलं होतं. त्यानंतर तात्काळ चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर लगेच चौकशी करुन कारवाई केली आहे. 

रुग्ण असलेले दत्तू सोनावणे आणि दगडू कांबळे यांच्याबरोबर हा प्रकार घडला होता. दोघेही वेगवेगळ्या आजारांसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. दोघांनी रक्ताची गरज होती. रक्त देण्याची जबाबदारी असलेल्या या दोन्ही परिचारिकांनी निष्काळजीपणा केला आणि सोनावणेंचं रक्त कांबळेंना आणि कांबळेंचं रक्त सोनावणेंना दिलं. यामुळे दोघांचीही प्रकृती खराब झाली मात्र सुदैवानं घातक असं कोणतंही रिअॅक्शन आलं नाही. 

परिचारिकांकडून झालेली ही चूक अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. सुदैवाने दोघांनाही रिअॅक्शन आलं नाही. साधारण असा काही प्रकार घडला की अर्ध्या तासांत रिअॅक्शन येतं. मात्र कांबळे आणि सोनावणे यांना कोणत्याही प्रकारचं रिअॅक्शन आलं नाही आहे. सध्या दोघांनाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

-Viral News : स्वत:च्या मुलाला 12 हजार पगार, मात्र जावई पाहिजे 60 हजार पगाराचा; विवाह इच्छुक तरुणाची पोस्टरबाजी

-Ajit Pawar : पैलवानांच्या मेळाव्यात अजित पवार म्हणाले, मी काय फक्त बारामती, बारामती करायला आलेलो नाही!

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts