ajinkya rahane and ruturaj gaikwad make 4 runs by running in csk vs gt ipl 2024 7th match watch

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajinkya Rahane And Ruturaj Gaikwad 4 Runs By Runing : आयपीएलमध्ये (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यामध्ये मंगळवारी सातवा सामना झाला. या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सचा दारुण पराभव झाला होता.चेन्नईच्या टीमनं होम ग्राऊंडवर सलग दुसरा विजय मिळवला. चेन्नईने दिलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा संघ फक्त 143 धावांपर्यंतच मजल मारु शकलाा. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 206 धावांचा डोंगर उभारला होता. यावेळी सामन्यात एक अनोखा कारनामा झाला. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि अजिंक्य रहाणे यांनी तब्बल चार धावा पळून काढल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार धावा पळून काढल्याचं क्वचितच पाहायला मिळते. अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेपॉक स्टेडियमवर हा पराक्रम केलाय. 

35 वर्षीय अजिंक्य रहाणे आणि युवा ऋतुराज गायकवाड यांनी फलंदाजी करताना चार धावा पळून काढल्या. चेन्नईच्या फलंदाजीवेळी नवव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर या दोघांनी चार धावा काढल्या. गुजरातकडून साई किशोर हा गोलंदाजी करत होता. साई किशोरनं टाकलेला चेंडू अजिंक्य रहाणे याने मिडविकेटला मारलात. चेंडू अडवताना चेन्नईच्या फलंदाजांनी गचाळ फिल्डिंग केली. याचा फायदा अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड यांनी घेतला. दोघांनी चार धावा पळून काढल्या. टी 20 क्रिकेटमध्ये चार धावा पळून काढल्याचे खूप कमी वेळा घडलेय. टी 20 क्रिकेट म्हटले की चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला जातो, पण चेन्नईच्या फलंदाजांनी तब्बल चार धावा पळून काढल्या. 

अजिंक्य रहाणे फ्लॉप – 

आयपीएलच्या 16 व्या हंगामात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणारा रहणे यंदाच्या हंगामात शांत दिसतोय. अजिंक्य रहाणेच्या बॅटमधून अद्याप हव्या तशा धावा निघेल्या नाहीत. आरसीबी आणि गुजरातविरोधात अजिंक्य रहाणे अपयशी ठरला. गुजरातविरोधात तर रहाणे याला 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा काढता आल्या. यामध्ये एकही चौकार अथवा षटकार नाही.. अजिंक्य राहणेची बॅट यंदाच्या हंगामात सध्या तरी शांतच दिसतेय.  

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts