IPL 2024 Rohit Sharma 200th IPL Match Sachin Tendulkar Presents Special Jersey SRH vs MI – Watch Video

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rohit Sharma 200th IPL Match: हैदराबादविरोधात मैदानात उतरताच रोहित शर्माने खास द्विशतक पूर्ण केले आहे. आयपीएलमध्ये एकाच संघाकडून 200  सामने खेळणाऱ्या खास क्लबमध्ये रोहित शर्मा पोहचला आहे. हैदराबादमध्ये एसआरएच आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना सुरु आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 277 धावांचा डोंगर उभारलाय. मुंबईकडूनही प्रतिकार केला जातोय. या सामन्याआधी रोहित शर्माला सचिन तेंडुलकरकडून खास भेट झाली आहे. रोहित शर्मा आयपीएल 2008 सत्रापासून खेळतोय. 2011 पासून रोहित शर्मा मुंबईचा नियमित सदस्य राहिला आहे. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 200 सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. मुंबईआधी रोहित शर्मा डेक्कन चार्जस संघाचा सदस्य होता. आयपीएलमध्ये रोहित शर्माने 245 सामने खेळले आहेत.  रोहित शर्माशिवाय विराट कोहली, एमएस धोनी यांनी एकाच संघाकडून 200 सामने खेळले आहेत. 

 विराट-धोनीच्या यादीत रोहित शर्मा – 

आयपीएलमध्ये एकाच संघाकडून सर्वाधिक सामने खेळण्यामध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. त्याशिवाय धोनीनेही एकाच संघाकडून 200 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. याच यादीमध्ये आता रोहित शर्माचा समावेश झाला आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये 245 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 6280 धावा केल्या आहेत. एक शतक आणि 42 अर्धशतकाचा समावेश आहे. रोहित शर्माची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 109 इतकी आहे. 

रोहित शर्माची वादळी सुरुवात – 

हैदराबादने दिलेल्या 278 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्माने 12 चेंडूमध्ये 26 धावांचे योगादान दिलं. रोहित शर्माने आपल्या छोटेखानी खेळीमध्ये तीन षटकार आणि एक चौकार लगावला.

धोनीने आयपीएल खेळलेत सर्वाधिक सामने – 

2008 मध्ये आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली. तेव्हापासून धोनी, रोहित आणि विराट आयपीएलच्या प्रत्येक हंगामात खेळले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 252 सामने खेळले आहेत. धोनी दोन हंगामात पुणे संघाचा सदस्य राहिला आहे. विराट कोहलीने एकाच हंगामाकडून सर्वाधिक सामने खेलण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहलीने आरसीबीसाठी 239 सामने खेळले आहेत. धोनीने 252 सामन्यात 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये 24 अर्धशतके आहेत. विराट कोहलीने 239 सामन्यात 7361 धावा केल्या आहेत. यामध्ये सात शतके आणि 51 अर्धशतकांचा समावेश आहे.

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts