Arunachal Pradesh Assembly Election CM Pema Khandu With 5 BJP Candidates Win Unopposed Assembly Election Marathi Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

इटानगर : एकीकडे लोकसभेत ‘400 पार’चा नारा देणाऱ्या भाजपने अरूणाचल विधानसभेत (Arunachal Pradesh Assembly Election) धडाकेबाज सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री चाऊना मिना यांच्यासह एकूण पाच उमेदवारांची विधानसभेसाठी बिनविरोध निवड झाल्याची माहिती समोर येत आहे. अरूणाचल प्रदेशमध्ये 19 एप्रिल रोजी विधानसभेच्या 60 जागांसाठी मतदान होणार असून अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस संपला आहे. 

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री किरण रिजूजू यांनी ट्विट करत ही माहिती दिली. अरूणाचल प्रदेशच्या या निकालावरून देशाचा मूड लक्षात येतो असं ते म्हणाले. 

अरूणाचल प्रदेशमध्ये येत्या 19 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी बुधवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस होता. एकूण 60 जागा असणाऱ्या विधानसभेमधील पाच ठिकाणी केवळ एकच अर्ज आल्याने त्या जागा बिनविरोध निवडून आल्याचं स्पष्ट झालंय. या सर्व पाचही जागा भाजपच्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चाऊना मिना यांचा समावेश आहे. त्याचसोबत राटू टेकी, जिक्की टाको, न्यातो दुकोम आणि मुटकू मिथी यांचा समावेश आहे. 

अरूणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रित मतदान होणार असून त्याचा निकाल 2 जून रोजी लागणार आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या एकूण जागांची संख्या 60 आहे. 2019 च्या निवडणुकीत एनडीएला 41 जागांवर विजय मिळाला होता.

अरूणाचल प्रदेश विधानसभेचे पक्षीय बलाबल –

एकूण जागा – 60

  • भाजप – 41
  • जनता दल युनायटेड – 7
  • नॅशनल पीपल्स पार्टी – 5
  • काँग्रेस – 4
  • अरूणाचल प्रदेश पार्टी – 1
  • अपक्ष – 2

 

ही बातमी वाचा: 



[ad_2]

Related posts