Nashik : नाशकात अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून पुस्तकांऐवजी आढळली धारदार शस्त्र, नेमका काय होता प्लॅन?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik Crime News : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून नाशिक गुन्हे शाखा एकच्या (Nashik Crime Branch Unit 1) पथकाने 7 चॉपर, 1 कोयता आणि 1 गुप्ती असे घातक शस्त्र ताब्यात घेतली आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 

या मुलांच्या शाळेतील एक दहावीचा (SSC Exam 2024) विद्यार्थी भूगोलचा शेवटचा पेपर आवरून एका मुलाला मारहाण करायला येणार होता आणि तो येताच त्याच्यावर हल्ला चढवण्याच्या तयारीत ही सर्व मुलं होती. गुन्हे शाखेच्या पथकाला वेळीच ही माहिती मिळताच त्यांनी चिंचबन परिसरात सापळा रचला होता. 

वादामागे प्रेम प्रकरण? 

ही पाचही मुलं नाशिकच्या दोन नामांकित शाळेतली आहेत. 15 ते 17 वयोगटातील ही मुले असून नववी आणि दहावीच्या इयत्तेत ते शिक्षण घेतात. ही शस्त्रे त्यांनी गुजरातच्या बडोद्याहून मागवली होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या वादामागे प्रेम प्रकरणाची किनार असल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग ही सध्या पोलिसांसाठी (Nashik Police) डोकेदुखी ठरत असून या प्रकरणामुळे तर पोलीसही चक्रावून गेले आहेत. 

पाच अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात

याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले की, गुन्हे शाखा युनिट एकचे विलास चारोस्कर, नितीन जगताप आणि मुक्तार शेख यांना माहिती मिळाली होती की, चिंचबन, मखमलाबाद नाका, क्रांतीनगर आणि घारपुरे घाट या ठिकाणी काही मुले शस्त्र घेऊन उभी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली. याप्रकरणी पाच अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

आता थेट पालकांवरच होणार कारवाई

विद्यार्थ्यांच्या दप्तरातून धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी विद्यार्थ्यांवर धारदार शस्त्र बाळगल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आमची पालकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे. अन्यथा आता पालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये मागील काही काळापासून गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत चालला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुलांचे समुपदेशन करायलादेखील सुरुवात केली आहे. मात्र अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत सहभाग काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी आता थेट पालकांवरच कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

संभाजीनगर हादरलं! बहिणीच्या ‘लव्ह मॅरेज’ला मदत केली म्हणून राग, डोक्यावर चार वेळा बोलेरो घालून काढला काटा

Mukhtar Ansari Property : 1200 कोटींची संपत्ती, गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू , काळ्या धंद्यांवर सरकारने केली होती मोठी कारवाई

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts