Ishan Kishan Refused To Play In Duleep Trophy East Zone Know The Reason; ईशान किशन हे काय करून बसला; कसोटी पदार्पणाचे स्वप्न पाहत असताना, स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारतीय कसोटी संघाचा मुख्य यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अपघात झाला होता. पंत नुकताच त्या अपघातातील दुखापतींमधून सावरत आहे. क्रिकेटच्या मैदानात तो लवकरच परतणार आहे. अशा स्थितीत श्रीकर भारत कसोटीत विकेटकीपिंग करत आहे. त्याच वेळी, इशान किशन देखील संघाचा एक भाग आहे. भरतने आत्तापर्यंत खेळलेल्या ५ कसोटी सामन्यांमध्ये कोणतीही आश्चर्यकारक कामगिरी केलेली नाही. आता टीम इंडियाला वेस्ट इंडिजमध्ये खेळायचे असून इशानला तेथे पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. पण तत्पूर्वी ईशान किशनबद्दल एक मोठी माहिती समोर येत आहे.कसोटी पदार्पणाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या इशान किशनने दुलीप ट्रॉफीमधून आपले नाव मागे घेतले आहे. तो ही स्पर्धा खेळणार नसल्याचे तो म्हणाल आहे. दुलीप ट्रॉफी ही भारताची देशांतर्गत प्रथम श्रेणी स्पर्धा आहे आणि झोन दरम्यान खेळवली जाते. ईशान किशनला पूर्व विभागाचे कर्णधारपद मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा २८ जूनपासून सुरू होणार असून १६ जुलैपर्यंत खेळवली जाणार आहे.

पूर्व विभाग निवड समितीच्या एका सदस्याने सांगितले की, “विभागीय निवड समितीचे समन्वयक देबाशिष चक्रवर्ती यांना विचारले होते की, आम्ही इशानची निवड करू शकतो का? ‘पांढऱ्या चेंडूत तो भारताचा सिनियर संघातील नियमित खेळाडू आहे आणि त्याला कर्णधारपद मिळाले असते. देबाशिष चक्रवर्ती यांनी इशानशी फोनवर संपर्क साधला आणि परत येऊन आम्हाला सांगितले की ईशानला दुलीप ट्रॉफी खेळण्यात रस नाही. त्याला दुखापत झाली आहे की नाही हे आम्हाला सांगण्यात आलेले नाही. त्याला फक्त खेळायचे नाही, असे सांगितले गेले.

SPIDER-MAN ACROSS THE SPIDER-VERSE च्या ट्रेलर लॉन्चला पोहोचला शुभमन गिल #shumbhmangill

अभिषेक पोरेल असणार किपर

इशान किशनने ४८ प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात ६ शतके आणि १६ अर्धशतकांच्या मदतीने ३८.७६ च्या सरासरीने २९८५ धावा केल्या आहेत. बंगालच्या अभिषेक पोरेलची पूर्व विभागीय संघात यष्टीरक्षक म्हणून निवड झाली आहे. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. त्याच्या या खेळाचे खूप कौतुक झाले. संघाचे कर्णधारपद बंगालच्या अभिमन्यू इसवरनकडे आहे.

[ad_2]

Related posts