India May Lose 6,500 Millionaires This Year Also They Will Preferre Countries Like Dubai Singapore Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India May Lose Millionaires This Year:  भारत (India) हा विकसनशील देश असला तरी सध्या भारताची अर्थव्यस्था ही प्रगतीपथावर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. त्यातच भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या (Millionaires) संख्येत देखील वाढ झाली असल्याचं चित्र सध्या देशात आहे. परंतु भारतातील या श्रीमंतांची संख्या कमी होण्याची शक्यता एका अहवलातून वर्तवण्यात आली आहे. हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशनच्या अहवलानुसार, या वर्षात जवळपास 6,500 श्रीमंत भारतीय देश सोडून सिंगापूर, दुबई यांसारख्या देशांमध्ये स्थायिक होण्याची शक्यता असल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे. 

चीन ‘या’ यादीमध्ये अव्वलस्थानी 

या अहवालानुसार, चीनमधील सर्वात जास्त श्रीमंत लोकं देश सोडून परदेशात स्थलांतरित होतात. यंदाच्या वर्षात चीनमधील जवळपास 13,500 श्रीमंत लोकं चीनसोडून (China) इतर देशांत जाऊ शकतात. तर मागील वर्षी जवळपास 10,800 श्रीमंत लोकांनी चीनमधून इतर देशांत स्थलांतर केले होते. चीननंतर या यादीमध्ये भारताचा क्रमांक येतो. 

‘या’ देशांना श्रीमंतांची पसंती

भारतात यंदा 6,500 श्रीमंत लोकं देश सोडून जाण्याची शक्यता आहे. तर मागील वर्षी भारतातून जवळपास 7,500 श्रीमंत लोकांनी परदेशांत स्थलांतर केलं होतं. या अहवालानुसार, या श्रीमंतांची पसंती ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब, सिंगापूर, अमेरिका, स्वित्झर्लंड या देशांना असू शकते. सध्या भारतात श्रीमंत लोकांची संख्या ही 3,44,600 आहे. तर यामधील सुमारे 1078 लोकांची संपत्ती ही 100 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक आहे. 

या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर युनाडेट किंगडमचा समावेश आहे. युनाडेट किंगडम मधून 3200 श्रीमंत लोकं देश सोडून जाण्याची शक्यता या अहवालातून वर्तवण्यात आली आहे. या अहवलात जे इतर देशांमध्ये कोटींची गुंतवणूक करु शकतात अशा लोकांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये रोख रक्कम, मालमत्ता किंवा शेअर्स यांच्या आधारे निष्कर्ष ठरवले जातात. भारतात आकारले जाणारे कर, व्यवसाय करण्यासाठी असलेलं नियम यांमुळे भारतातील श्रीमंत लोकं देश सोडून जात असल्याचं देखील या अहवालातून सांगण्यात आलं आहे. 

पहिल्या दहामध्ये ‘या’ देशांचा समावेश

या देशांनंतर नंतर या यादीमध्ये रशिया आणि ब्राझील या देशांचा समावेश आहे. या अहवालानुसार रशियामधून 3,000 तर ब्राझीलमधून 1,200 श्रीमंत देश सोडून जाण्याची शक्यत वर्तवण्यात आली आहे. तर यानंतर हाँगकाँगमधून (1,000), दक्षिण कोरिया (800),मेक्सिको (700), दक्षिण आफ्रिका (500) आणि जपान (300) या देशांचा पहिल्या दहा देशांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जर या अहवालातील आकडेवारी खरी ठरली तर चीन नंतर भारत हा दुसरा देश ठरु शकतो जिथून सर्वात जास्त श्रीमंंत लोकं स्थलांतरित होत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आधी कोंबडी की, अंड? ज्या प्रश्नानं लहानपणापासून गोंधळवलं, त्याचं अखेर शास्त्रज्ञांनी उत्तर शोधलं

[ad_2]

Related posts