Vijay Shivtare withdraw From Bamamati Loksabha election shitare extence support to sunetra pawar In baramati Loksabha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सासवड, पुणे : बारामती लोकसभा   Baramati Loksabha Constituency) लढणारच, असा निर्धार केलेल्या विजय शिवतारेंनी  (Vijay Shivtare)  अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अजित पवारांना आणि सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जनता अजित पवारांना मतदान करणार नाहीत, त्यांचा उर्मटपणा गेला नाही, असं म्हणाऱ्या शिवतारेंनी अखेर यु-टर्न घेत  सुनेत्रा (Sunetra Pawar) वहिनींना आम्ही बहुमताने निवडून आणू, अशी घोषणा केली आहे.  

‘दीड लाख मतं ही महायुतीच्या उमेदवाराला झाली पाहिजेत, मुख्यमंत्र्याशी झालेल्या बैठकीत अशा सर्वांना सुचना देण्यात आल्या. अजित दादांनी स्पष्टपणे सांगितलं की पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदींना करायचं आमचं सगळ्यांचं ध्येय आहे. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मत देखील जाता कामा नये असं काम करायचं आणि हा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणायचा’, असं ते म्हणाले. 

मोदींच्या हात बळकट करण्याचं काम करणार!

पुढे बोलताना शिवतारे म्हणाले की, दादांच्या हातून काही चुका झाल्या असतील काय झाले असतील पण आज मोठं ध्येय साधण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. त्या भावनेतून ते सगळं बाजूला ठेवून हा उमेदवार निवडून आणून पंतप्रधान मोदींच्या हात बळकट करण्याचं काम करावं,असा ठराव आज आम्ही केला आणि सुरुवातीच्या काही लोकांच्या रिएक्शन्स होत्या पण जेव्हा हे सगळं ऐकलं त्याच्या नंतर सर्व लोकांनी एक मुखाने घोषणा दिल्या. 

आधी अजित पवारांवर आरोप आता सुनेत्र पवारांना पाठिंबा!

बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केलेल्या विजय शिवतारेंनी अजित पवारांवर अनेक आरोप केले होते. त्यांच्यावर टोलेबाजी केली होती. इंदापूरची जनता अजित पवारांना साथ देणार नाही. मी जनतेचा कौल घेतला तेव्हा जनता त्यांच्या विरोधात आहे. त्यांना मतं पडणार नाही, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यासोबतच बारामतीचा सातबारा पवारांकडे नाही आणि अजित पवारांचा उर्मटपणादेखील अजून गेलेला नाही. त्यामुळे जनता अजित पवारांच्या विरोधात आहे, असा हल्लाबोल अजित पवारांवर केला होता. त्यानंतर अजित पवारांची बारामतीत डोकेदुखी वाढली होती. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी बोलून घेतलं आणि शिवतारेंची समजूत काढली. तरीही शिवतारे कोणतीही भूमिका स्पष्ट करत नव्हते. मुख्यमंत्र्याच्या ओएसडीच्या एका फोनमुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांना अडचण होऊ नये, म्हणून माघार घेतल्याचं ते म्हणाले. आता माघार घेतल्यानंतर त्यांनी लगेच सुनेत्र पवारांना विजयी करण्याच्या घोषणा दिल्या आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

Vijay Shivtare : मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीतून विजय शिवतारेंची माघार; अजित पवार, सुनेत्रा पवारांना दिलासा

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts