Nashik Loksabha : नाशिकच्या जागेचा गुंता सुटेना! आता राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा दावा, भुजबळांनाही टोला लगावला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Radhakrishna Vikhe Patil : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा (Nashik Lok Sabha Constituency) पेच महायुतीत (Mahayuti Seat Sharing) अद्याप कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही नाशिकची जागा लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यात भाजपदेखील नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहे. आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी नाशिकच्या जागेबाबत मोठं वक्तव्य केले आहे. 

एकीकडे नाशिकच्या जागेवरुन महायुतीत तिढा कायम असतानाच दुसरीकडे आज नाशिक भाजप कार्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभेचा आढावा घेण्यात आला आहे. या बैठकीला गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती होती. नाशिकची जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली आहे. 

नाशिकमध्ये भाजपची ताकद जास्त

बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, उमेदवारीची प्रक्रिया सुरू आहे.  महायुतीत चर्चा सुरू आहे.  पहिल्यापासून नाशिकची जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी, असा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. यावर पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील. नाशिकमध्ये 100 च्यावर भाजपचे नगरसेवक आहेत. नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद जास्त आहे. भाजपला उमेदवारी मिळाल्यास उमेदवार नक्कीच निवडून येईल, असा दावा राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी व्यक्त केला.  

विखेंचा भुजबळांना टोला

दिल्लीच्या बैठकीत नाशिकच्या उमेदवाराबाबत माझ्या नावाची चर्चा झाली, असे म्हणत छगन भुजबळ यांनी लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, त्यांना दिल्लीवरून काय सांगितले याची आम्हाला कल्पना नाही.  आम्ही ग्राउंड लेव्हलला काम करणारे आहोत.  महायुती जो उमेदवार देईल त्याचं आम्ही काम करू, असे ते म्हणाले. 

महायुतीमध्ये क्षमता जास्त 

महायुतीच्या जागावाटपावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, चिंता करण्याचे कारण नाही. चौथ्या टप्प्यातील निवडणूक मे महिन्यात आहे. मागच्या काळात पंधरा दिवसात उमेदवारी जाहीर झाली. महायुतीमध्ये क्षमता जास्त आहे. लोकप्रियता आहे. नेतेमंडळी समर्थ आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 

विरोधात कोण आहे याचा विचार आम्ही करत नाही

अहमदनगर लोकसभेवर शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आमच्या विरोधातील उमेदवाराला भर घातलेली दिसत आहे. 2019 लादेखील आमची लढाई पवारांविरोधात होती. स्वतः पवार साहेब दक्षिण नगरमध्ये तळ ठोकून होते . मात्र मोदी साहेबांना मतदान करणारी जनता आहे. विखें विरोधात आणखी कोणी व्यक्तिगत पातळीवर निवडणूक घेऊन जात असेल त्यात भर आहे.  ही जनता मोदी साहेबांना मतदान करणार आहे. त्यामुळे तिथे विरोधात कोण आहे याचा विचार आम्ही करत नाही.

उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय

देवेंद्र फडणवीस यांचा जाण्या-येण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी करतो, त्यांनी मणिपूरला जावं, त्यांनी लडाखला जावं, पण त्यांनी तिथे जाऊन परिस्थिती पाहावी. त्यांनी एखादा बॉलिवूड निर्माता शोधून मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, अशी टीका उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे.  उद्धव ठाकरेंच्या प्रवक्त्याचे जसे संतुलन बिघडले आहे त्याचाच परिणाम त्यांच्यावर झाला आहे. त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे. दोन वर्ष घरात बसून काय केले. त्यांनी कशाला मोठ्या नेत्यांबद्दल बोलावे, आपली पात्रता पाहिजे. मागच्या काळात ज्यांचे बोट धरून आपण सत्तेत राहिलात. त्यांच्यावर तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. तुमची पात्रता काय आहे, अशी टीका त्यांनी येवेली केली आहे. 

आणखी वाचा 

उद्धव ठाकरेंचं भाजपला खुलं आव्हान, हिंमत असेल तर… : रामलीला मैदानात मोठी घोषणा

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts