Uddhav Thackeray open challenge to BJP modi Government if you dare to do this delhi Ramlila Maidan Lok Sabha Election 2024 politics marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्लीतील रामलीला मैदानातून मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना अटक केली आणि भाजपमध्ये गेलेल्या ठगांवरील केसेस मागे घेत त्यांना भाजपच्या वॉशिम मशीनमधून धुवून काढलं, असं म्हणत ईडी कारवाईवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 

दिल्लीत आज सगळे विरोधक एकवटले 

निवडणूक प्रचारासाठी नाही, लोकशाहीसाठी आलोय. भाजपमध्ये भ्रष्ट्राचारी लोक आहेत, तुम्ही तुमचं भविष्य कुणाच्या हातात देणार का, तुम्ही सगळे ठग आहात का, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत आज विरोधी पक्षांची लोकशाही बचाव रॅली आयोजित करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सगळे विरोधक एकवटले आहेत.

उद्धव ठाकरेंचं भाजपला खुलं आव्हान

माझ्या देशातील भारतीय घाबरणारे नाहीत, तर लढणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुलं आव्हान देत म्हटलं आहे की, तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या बॅनरवर लिहा की, ईडी, सीबीआय, आयटी डिपार्टमेंट भाजपच्या तीन साथी पक्ष आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप लावून त्यांना तुरुंगात टाकलं, हेमंत सोरेन यांच्यावर आरोप करत त्यांना तुरुंगात टाकलं. ही कोणती पद्धत आहे. 

आता वेळ आलीय : उद्धव ठाकरे

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचं आरोप केले, त्यांना पक्षात घेत त्यांच्यावरचे आरोप पुसून टाकले. या भ्रष्ट लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? किती दिवस आपण हे सहन करायचं, आता त्यांचं 400 पारचं स्वप्न आहे. एक व्यक्ती आणि एका पक्षाचं सरकार देशासाठी धोकादायक आहे आणि आता हा व्यक्ती आणि या पक्षाचं सरकार पाडण्याची वेळ आलीय.

केजरीवाल यांच्या अटकेविरोधात विरोधकांची एकजूट

राजधानी दिल्लीत आज सगळे विरोधक एकवटले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. विरोधी पक्षाच्या ‘लोकशाही बचाओ रॅली’मध्ये  महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सभास्थळी पोहोचले आहेत.  शरद पवारही सभास्थळी दाखल झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवालही उपस्थित आहेत. 

उद्धव ठाकरेचं देशातील जनतेला आवाहन

उद्धव ठाकरेंनी रामलीला मैदानातून देशवासियांना आवाहन करत म्हटलं आहे की, मजबूत देशासाठी आपल्याला एकजुटीचं सरकार आणावं लागेल. देशातील प्रांत-राज्याचा सन्मान करणारं सरकार आणलं तरंच देश वाचेल. तुमचं भविष्य कुणाच्या हातात द्यायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. आम्ही प्रचारासाठी नाही, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. 

दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची लोकशाही बचाव रॅली

रामलीला मैदान हे ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार ठरलेल्या मैदानात आज विरोधक एकवटले आहेत. मोदी सरकारविरोधात विरोधकांची एकजूट दाखवण्यासाठी रामलीला मैदानावर ‘लोकशाही वाचवा’ रॅली काढण्यात येत आहे. दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडी एकत्र जमल्याचं पाहायला मिळत आहे. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts