Pune bribe News satbara registration 80 thousand rupees bribe agent crime loni kalbhor Pune crime news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : सातबारा नोंदीसाठी 80 हजारांची लाच मागणाऱ्या मध्यस्थाविरुध्द (Pune Crime news) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मध्यस्थ व्यक्तीने थेऊरच्या तत्कालीन मंडल अधिकाऱ्यासाठी लाचेची मागणी केल्याचे तपासात समोर आलं आहे. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे विभागाने ही कारवाई केली आहे. विजय सुदाम नाईकनवरे असे गुन्हा दाखल झालेल्या मध्यस्थाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय तक्रारदार शेतकऱ्याची हवेली तालुक्यात कोलवडी येथे शेतजमीन आहे. या शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद आणि फेरफार मंजूर करण्यासाठी नाईकनवरे याने थेऊरच्या मंडल अधिकाऱ्यासाठी शेतकऱ्याकडे 80 हजार रुपयांची मागणी केली. परंतु याबाबत शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली.पडताळणी केल्यानंतर नाईकनवरे याने मंडल अधिकाऱ्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून नाईकनवरे याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

महापालिकेतंही लाच घेण्याचे प्रकार सुरुच

काही दिवांपूर्वी पुणे महापालिकेच्या पथ विभागातील एका (Pune News) उपअभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये 500 रुपयांच्या बंडलची मोठी रक्कम सापडली आणि एकच खळबळ उडाली होती. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलेल्या उपअभियंत्याने ही रक्कम माझी नाही, असे सांगत मात्र वेळ मारून नेली होती. या घटनेचा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत झाला होता.आम आदमी पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष रविकांत काळे हे काही कामानिमित्ताने गेले होते. त्यावेळी एका उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये एक व्यक्ती संशयास्पद काहीतरी ठेवून गेली हे लक्षात आलं आणि हा सगळा प्रकार समोर आला. हा सगळा प्रकार पुणे महापालिकेतील पथ विभागात घडला होता. 

लाचखोरांवर कारवाई 

पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार सुरु असल्याचं कायम समोर येतं. या लाचखोरांमुळे प्रशासन बदनाम होतााना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून लहान मोठ्या रकमेसाठी काम अडवणं, काम पूर्ण करण्यासाठी लाच मागणं आणि लाच न दिल्यासं धमकीदेखील देण्याचे प्रकार कायम समोर येतात. मात्र गलेलठ्ठ पगार असूनही लाच घेणारे अधिकारी सर्सार दिसतात. या अधिकाऱ्यांवर अनेकदा कारवाई झाली आहे. त्यांचं निलंबनदेखील करण्यात आलं आहे. मात्र तरीही असे प्रकार सुरुच असल्याचं घडलेल्या घटनांमधून समोर येत आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : तरुण कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावला, नागरिकांनी आरडाओरड केली अन् मोठा अर्थ टळला; पुण्यात नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts