MPSC PSI Physical Testing Program Exam Schedule Changes PSI Exam Date changed due to Lok Sabha election polling marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MPSC PSI Exam Schedule Changes : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा पाहता एमपीएससीने (MPSC) महत्वाचा निर्णय घेतला असून, पोलीस उपनिरीक्षक (PSI) संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात (Physical Testing Program) बदल करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस मुख्यालय (Navi Mumbai Police Headquarters) येथे 15 ते 17 एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी पार पडणार आहे. मात्र, लोकसभा निवडणूक पाहता 19, 26 आणि 27 एप्रिल रोजी होणाऱ्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यावेजी 29, 30 एप्रिल आणि 2 मी रोजी होणार आहे. बाकी इतर तारखांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

याबाबत एमपीएससीकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक 15 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम निश्चित करताना लोकसभा निवडणूकीतील मतदानाचे टप्पे विचारात घेऊन त्या-त्या टप्प्यातील उमेदवारांना अन्य दिवशी शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. तथापि भारतीय निवडणूक आयोगाकडील प्राप्त निवेदने विचारात घेता दिनांक 19, 26 व 27 एप्रिल 2024 रोजीच्या उमेदवारांची शारीरिक चाचणी अनुक्रमे दिनांक 29, 30 एप्रिल 2024  व 2 मे 2024 या दिवशी पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे एमपीएससीकडून सांगण्यात आले आहेत. 

वेळापत्रकात असा बदल 

  • 19 एप्रिलचा ग्राउंड 29 एप्रिलला होणार आहे. 
  • 26 एप्रिलचा ग्राउंड 30 एप्रिलला होणार आहे. 
  • 27 एप्रिलचा ग्राउंड 2 मे रोजी होणार आहे.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक बदल करण्याची मागणी…

परभणी लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने 25 एप्रिल रोजी मतदान केंद्रांवर मतदार प्रतिनिधी जाणार आहेत. यामध्ये प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असून, या कारणाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत असलेल्या अंतिम आणि उन्हाळी सत्राच्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी परभणीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी पत्राद्वारे कुलगुरू यांच्याकडे केली आहे. निवडणूक तात्काळ म्हणुन हे पत्र असल्याने या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Majha Katta : म्हणून श्रद्धा जोशींनी दागिन्यांचा त्याग केला, शर्मा दाम्पत्याचा सकारात्मकता पेरणारा ‘माझा कट्टा’

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts