baramati loksabha election 2024 Vijay Shivtarni finally for the campaign of Sunetra Pawar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

इंदापूर, पुणे : विजय शिवतारेंनी   (Vijay Shivtare)माघार घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवारांना जिंकून आणण्यासाठी शिवतारे कामाला लागले आहे. अजित पवारांवर विविध आरोप, पवार कुटुंबियांवर हल्लाबोल, बारामती लोकसभा Baramati Loksabha Constituency)  लढवण्याचा निर्धार आणि त्यानंतर माघार हे सगळं झाल्यावर आता शिवतारे सुनेत्रा पवारांचा  (Sunetra Pawar) प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहे.विजय शिवतारे यांच्या माघारीनंतर पुरंदरमध्ये महायुतीची समन्वय बैठक बोलवली आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघात आज महायुतीची समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. 

पुरंदर तालुक्यातील ढुमेवाडी येथे होणार बैठक होणार आहे. बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. बैठकीला महायुतीचे आजी माजी आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विजय शिवतारे मुंबईत असल्याने बैठकीला जाणार नाही आहेत मात्रत्यांचे कार्यकर्ते मात्र लावणार बैठकीला हजेरी लावणार आहेत आणि प्रचाराची रणणिती आखणार आहे. 

विजय शिवतारेंनी बारामती लढण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर अजित पवार , पवार कुटुंबियांवर आरोपांवर आरोप केले. मात्र त्यांनी निवडणूक लढवली असती तर सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंची अडचण वाढली असती. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी शिवतारेंना बोलवून घेतलं. त्यांना माघार घेण्यास सांगितली. त्यांची मनधरणी केली. त्यानंतर शिवतारेंनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर त्यांनी शब्द बदलले आणि सुनेत्रा वहिनींना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. 

आधी अजित पवारांवर आरोप आता सुनेत्र पवारांना पाठिंबा!

बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केलेल्या विजय शिवतारेंनी अजित पवारांवर अनेक आरोप केले होते. त्यांच्यावर टोलेबाजी केली होती. इंदापूरची जनता अजित पवारांना साथ देणार नाही. मी जनतेचा कौल घेतला तेव्हा जनता त्यांच्या विरोधात आहे. त्यांना मतं पडणार नाही, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यासोबतच बारामतीचा सातबारा पवारांकडे नाही आणि अजित पवारांचा उर्मटपणादेखील अजून गेलेला नाही. त्यामुळे जनता अजित पवारांच्या विरोधात आहे, असा हल्लाबोल अजित पवारांवर केला होता. त्यानंतर अजित पवारांची बारामतीत डोकेदुखी वाढली होती. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी बोलून घेतलं आणि शिवतारेंची समजूत काढली. तरीही शिवतारे कोणतीही भूमिका स्पष्ट करत नव्हते. मुख्यमंत्र्याच्या ओएसडीच्या एका फोनमुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांना अडचण होऊ नये, म्हणून माघार घेतल्याचं ते म्हणाले. आता माघार घेतल्यानंतर त्यांनी लगेच सुनेत्र पवारांना विजयी करण्याच्या घोषणा दिल्या होत्या.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : तरुण कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावला, नागरिकांनी आरडाओरड केली अन् मोठा अर्थ टळला; पुण्यात नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts