Lionel Messi Will Not Play In The Next World Cup For Argentina ; मेस्सी अर्जेंटीनाकडून पुढचा वर्ल्डकप का खेळणार नाही जाणून घ्या एकमेव कारण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने गतवर्षी वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा जिंकली. मात्र, आता मेस्सी आगामी २०२६चा वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी लढत होणार आहे, त्यापूर्वी मेस्सीने या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे.‘मागील म्हणजे २०२२ ची स्पर्धा ही माझी कदाचित अखेरची वर्ल्ड कप स्पर्धा होती, असे मी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. पण त्यावेळी ही गोष्ट स्पष्ट झाली नव्हती. पण आता मी पुढचा विश्वचषक खेळणार नसल्याचे ठरवले आहे, त्यामुळे आता पुढच्या विश्वचषकात मी अर्जेटींनाकडून खेळताना दिसणार नाही. पण या गोष्टीला अपवादही असू शकतो. कारण भविष्यात काय होईल, हे मी सध्याच्या घडीला सांगू शकत नाही. सध्या मी पुढील विश्वचषक न खेळण्याचे ठरवले आहे. पण जर परिस्थिती बदलली तर कदाचित मला विश्वचषकात खेळावे लागू शकते पण या गोष्टीची शक्यता मात्र कमी आहे, असे मेस्सीने सांगितले.

आगामी वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होईल, त्या वेळी मेस्सी ३९ वर्षांचा असेल. ही स्पर्धा कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिकेत होणार आहे. दरम्यान, अर्जेंटिना-ऑस्ट्रेलिया लढतीची तिकिटे झपाट्याने विकली जात आहेत. बीजिंगमधील वर्कर्स स्टेडियमची क्षमता ६८ हजार आहे. या सामन्याचे तिकीट ४ हजार ८०० युआन (सुमारे ६७१ डॉलर) असूनही तिकिटांना जोरदार प्रतिसाद असल्याचे सांगितले जात आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील उप-उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियास २-१ असे पराभूत केले होते. ‘फिफा’ क्रमवारीत अर्जेंटिना अव्वल, तर ऑस्ट्रेलिया २९व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी अर्जेटीनाचे पारडे जड समजले जात आहे. पण मेस्सी यावेळी कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. आता मेस्सी अर्जेटींनाकडून फार कमी काळ खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो यावेळी कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

गेल्या विश्वचषकात मेस्सीने नेत्रदीपक कामगिरी केली होती आणि संघाच्या विश्वविजयात मोलाचा वाटा उचलला होता.

[ad_2]

Related posts