Unmesh Patil Entry in Shiv Sena Uddhav Thackeray group at matoshree BJP MP Unmesh Patil joins shivsena UBT Jalgaon Lok Sabha Election 2024 maharashtra politics marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil)  यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटात प्रवेश (UBT Shivsena) केला आहे. आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश पार पडला आहे. भाजपने लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज असल्याने ते ठाकरे गटात दाखल झाले आहेत. 

खासदार उन्मेष पाटील यांच्या हाती शिवबंधन

उन्मेष पाटील यांनी मंगळवारी थेट मुंबईत दाखल होत खासदार संजय राऊतांची भेट घेतली. त्यानंतर मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्यांची बैठक झाली. त्यामुळे उन्मेष पाटील ठाकरे गटात जाण्यावर शिक्कामोर्तब झाला होता त्यानंतर त्यांचा आज शिवसेना ठाकरे गटात अधिकृत पक्षप्रवेश झाला आहे. जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे.

पक्षप्रवेशावर उन्मेश पाटील यांची प्रतिक्रिया

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला माझ्या कामाची किंमत नाही, एका भावाने दगा दिला असला तरी, दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत आहे, हा मला विश्वास असल्याने आपण शिवसेना ठाकरे गटात सामील होत असल्याचं उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे.

उन्मेष पाटील यांचं लोकसभेचं तिकीट कापलं

लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपने ऐनवेळी उन्मेष पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा लोकसभेसाठी तिकीट न मिळाल्याने उन्मेष पाटील नाराज होते. त्यामुळे नाराज उन्मेष पाटील यांनी मंगळवारी ठाकरे गटाचे नेत्यांची भेट घेतली. त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती.

कोण आहेत उन्मेष पाटील?

  • उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप खासदार आहेत.
  • या आधी त्यांनी 2014 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली होती.
  • ते चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आमदार होते. 

 

अधिक पाहा..

Related posts