पत्नीच्या क्रूरतेमुळे ‘मास्टरशेफ’मधील शेफला घटस्फोट मंजूर! पत्नी करायची मारहाण, अपमान अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chef Kunal Kapur Divorce Cruelty By Wife: दिल्ली उच्च न्यायालयाने प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरला पत्नी छळ करत असल्याचा मुद्दा गृहीत धरत घटस्फोट मंजूर केला आहे. कुणालच्या पत्नीचं कुणालप्रती वागणं हे ‘सन्मान आणि सहानुभूती नसलेलं’ आहे, असं निरिक्षण कोर्टाने नोंदवलं. न्यायामूर्ती सुरेश कुमार कैट आणि निना बन्सल कृष्णा यांनी आज (3 एप्रिल 2024) कुणालला घटस्फोट मंजूर केला आहे.

लग्नाच्या नात्याला काळीमा

“सध्याच्या प्रकरणामध्ये ज्या गोष्टी आमच्या समोर मांडण्यात आल्या आहेत त्यामधून आम्हाला असे आढळून आले आहे की अर्जदाराबरोबर (कुणाल) प्रतिवादीचे (कुणालच्या पत्नीचे) वर्तन त्याचा आदर न करणारे आणि त्याच्याप्रती सहानुभूती न दाखवणार होते,” असं कोर्टाने निकालामध्ये म्हटलं आहे. “कोणी आपल्या जोडीदाराबरोबर असं वागत असेल तर लग्नाच्या नात्याला तो काळीमा असतो. अशावेळेस एकत्र राहण्यास भाग पाडून या यातानांसहीत त्याला जगण्याची सक्ती करण्याचं कोणतेही योग्य कारण आम्हाला दिसत नाही,” असंही कोर्टाने सांगितलं. 

तिने सासऱ्यांनाही मारहाण केली

कुणाल कपूरचं 2008 साली लग्न झालं. कुणालची पत्नी अनेकदा त्याची तक्रार करण्यासाठी पोलिसांना फोन करायची. तसेच सोशल मीडियावर मी तुझ्याबद्दल अफवा पसरवेल अशी धमकीही तिने त्याला दिली होती. कुणाल कपूरला लोकप्रियता मिळू लागल्यानंतर ती त्याला खोटे आरोप लावून बदनाम करण्याच्या धमक्या देऊ लागली. 2016 साली कुणालची पत्नी अचानक मास्टर शेफच्या स्टुडीओमध्ये त्यावेळी त्याच्या 4 वर्षांच्या मुलाबरोबर दाखल झाली आणि गोंधळ घालू लागली. एकदा तिने कुणालाच मोबाईल खेचून त्याच्या कानाखाली लगावल्याचंही सांगितलं जातं. तसेच अनेकदा घरगुती वादादरम्यान कुणालच्या पत्नीने हाताला मिळेल त्या गोष्टींनी त्याला तसेच सासऱ्यांना मारल्याचंही खटल्याच्या सुनावणीदरम्यान सांगण्यात आलं. कुणालच्या पत्नीने हे सारे आरोप फेटाळून लावत सासरचे लोक आपल्यावर नोकरीसाठी दबाव आणत होते, असा तिला आरोप आहे. 

त्याने कष्टाने सारं मिळवलं

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने, “जोडीदारासंदर्भात सार्वजनिकपणे निष्काळजी दाखवणे, बदनामी करणे, अपमानास्पद आणि बिनबुडाचे आरोप करणे हे क्रूरतेसारखे आहे,” असं म्हटलं. तसेच कोर्टाने “येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की लग्नानंतर दोन वर्षांमध्ये अर्जदाराने स्वत:ला सेलिब्रिटी शेफ म्हणून प्रस्थापित केलं. त्याने त्याच्या कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाचे हे मिळवलं. जर तो त्याच्या जोडीदारावर अवलंबून असता तर इथपर्यंत पोहोचलाच नसता,” असंही आवर्जून नमूद केलं. 

ही क्रूरताच

या प्रकरणामध्ये दोन्ही बाजून ऐकून घेतल्यानंतर वस्तुस्थिती लक्षात घेता, पत्नीने केवळ न्यायालयासमोर बदनामी करण्यासाठी अर्जदारावर आरोप केल्याचं दिसत आहे. असे निराधार दावे जोडीदाराच्या प्रतिष्ठेवर परिणाम करतात. हे असं वागणं म्हणजे क्रूरतेचे प्रमाण आहे, असं म्हणत कोर्टाने घटस्फोटाला मंजूरी दिली.

Related posts