Vasant More Start campaign after announcement on loksabha candidate From VBA pune Loksabha constituency( प्रगत भारत । pragatbharat.com)

 पुणे : वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेची (Pune Lok Sabha Constituency) जागा ही वसंत मोरे  (Vasant More) यांना देण्यात आली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करूनत्यांच्या प्रचाराचा नारळ देखील फोडलेला आहे. मी कधीही नुरा कुस्ती केली नाही. आता मी चितपट मारणार, असं म्हणत मी शंभर टक्के निवडून येण्याचा विश्वास वसंत मोरेंनी व्यक्त केला आहे. 

वसंत मोरे म्हणाले, ज्यांनी देशाचं वाटोळं केलं त्या भारतीय जनता पार्टीचे विरोधात ही निवडणूक असणार आहे. वसंत मोरे यांनी आयुष्यात कधी नोरा कुस्ती केली नाही आणि वसंत मोरे चितपटच मारणार आहे. मी शंभर टक्के मी निवडणूक जिंकणार  आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जरी होतो तरी तेव्हा सुद्धा मी या उपनगराचा विकास केलेला हे संपूर्ण पुणे नाही तर महाराष्ट्राने पाहिलेले आहे. माझा कात्रजच्या विकासाचा पॅटर्न होता तोच पुणे शहरामध्ये चालू राहील आणि मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे. पुण्याचा सर्वांगीण विकास हा माझा प्रचाराचा पहिला मुद्दा असेल. पहिल्यांदा पुण्यामध्ये जर विकासाचा कुठलं काम करायचं असेल तर मी ते वाहतूक या विषयावरती करेल, असंही ते म्हणाले. 

विकासासंदर्भात वसंत मोरे म्हणाले की,  चार वर्षे पूर्ण कालावधीपासून पुणेकरांच्या सेवेमध्ये आहे त्यामुळे मला विकासकाम काही नवीन नाही आहे. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आतापर्यंत संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. कुठली राजकीय पार्श्वभूमी नाहीये त्यामुळे मला वाटते की संघर्ष करत राहायला पाहिजे आणि मी तो करत राहील आणि या संघर्षातून मी यशस्वी होईल. 

पुण्यात तिहेरी लढत

पुण्यात सुरुवातीला रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळांमध्ये तगडी लढत होणार होती मात्र आता वसंत मोरे हे वंचितकडून मैदानात उतरल्याने ही लढत तिहेरी होणार आहे. तिघेरी पुण्याचे तगडे उमेदवार आहेत. तिघांचाही दांडगा संपर्क आहे. कोरोना काळात तिघांनीदेखील जनतेची कामं केली आहेत. आता पुणेकर नेमकी कोणाला पसंती देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Vasant More : रुसले,फुगले, राजीनामा दिला, उमेदवारीसाठी फिर फिर फिरले अन् अखेर वसंत मोरे पुण्याच्या मैदानात उतरले, राजीनाम्यापासून आतापर्यंत काय काय घडलं?

 

 

 

अधिक पाहा..

Related posts