Baramati Loksabha Constituency katewadi citizen support ajit pawar banner on houses in Katewadi baramati

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

काटेवाडी, बारामती : अजित पवारांना (Ajit Pawar)  कुटुंबाने  (Baramati Loksabha Constituency)जर एकटं पाडलं असलं तरी काटेवाडीतील काही घरांमध्ये दादा वहिनी हे तुमचं कुटुंब आम्हीच इथले उमेदवार अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत. बारामती तालुक्यातील काटेवाडी हे अजित पवारांचं गाव आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतील एका सभेत कुटुंबात मला एकटा पाडलं तरी बारामतीकरांनी एकटे पाडू नये, अस आवाहन केलं होतं. सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना अजित पवारांचं कुटुंब वगळता संपूर्ण पवार कुटुंब हे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या विरोधात प्रचार करत आहे. त्यामुळे काटेवाडीतील काही घरांमध्ये अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत.

‘आम्ही जे आता बोर्ड लावलेले आहेत दादा वहिनी हे तुमचं कुटुंब आणि आम्हीच इथले उमेदवार, असं हे बोर्ड लावले आहे. मागचं कारण हेच आहे की दादांनी या गावचा विकास पण केलेला आहे आणि दादांना असं एकटं पाडलं जात आहे. अजित दादा एकटेच आहेत आणि बाकीचे सर्व कुटुंब विरोधात आहेत तर ते चुकीचं ठरवण्यासाठी किंवा दादांना साथ देण्यासाठी किंवा हे काटेवाडीकर हे बारामतीकर हेच, आम्ही पण तुमच्या कुटुंबातले आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही हे बोर्ड बोर्ड लावलेले आहेत’, असं गावकरी मिलिंद काटे यांनी सांगितलं आहे. 

सुनेत्रा पवार यांनी 2008  आमच्या इथं काटेवाडी ग्रामपंचायतमध्ये काम करताना एक क्रांतिकारक निर्णय घेतला होता की महिलांचे नाव घरावर असावं. हाच निर्णय आता राज्य शासनाने घेतलेला आहे. आपल्या मुलाच्या पुढे आईचं नाव नंतर वडिलांचं आणि नंतर आडनाव हा जो निर्णय आहे तो 2008 सालीच काटेवाडीचा ग्रामसभेमध्ये घेतलेला होता आणि असे क्रांतिकारक निर्णय यांनी घेतलेला आहे आणि कुटुंबात ते एकटे नाहीत सुनेत्रा वहिनी आणि अजित दादा आणि आम्ही सर्व संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभा आहोत याची खात्री आम्ही देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

सध्या बारामती लोकसभेची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण पवार विरुद्ध पवार अशी ही निवडणूक होत आहे. पवारांचं अख्ख कुूटुंब अजित पवारांच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहे. मात्र काटेवाडी गावकरी अजित पवारांना खास पाठिंंबा देताना दिसत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या-

-Dharashiv Lok Sabha : धाराशिवचा तिढा सुटला, तानाजी सावंत एक पाऊल मागे? भाजपच्या आमदाराच्या पत्नीची वर्णी लागण्याची शक्यता

-Ram Satpute : सोलापुरात विमानतळ अन् आयटी पार्क उभारणार, सोलापूर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा शब्द

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts