Pakistan Hina Rabbani On Pm Narendra Modi India Pakistan Relation 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pakistan Hina Rabbani On Indo-Pak Relation: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचे सरकार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून 6.5 दशलक्ष डॉलर्सचे बेलआउट पॅकेज (Pakistan Latest News) मिळावं म्हणून सातत्याने प्रयत्नशील आहेत, पंण त्यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. यावर आता पाकिस्तानेच्या  परराष्ट्र सचिव हिना रब्बानी खार यांनी एक वक्तव्य केलंय. पाकिस्तानला भारतासोबत व्यापार करायचा आहे, पण नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत ते शक्य नाही असं त्या म्हणाल्या. 

पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव हिना रब्बानी खार (Hina Rabbani Latest News) यांनी अमेरिकन वेबसाइट पॉलिटिकोला मुलाखत देताना सांगितले की, आम्ही भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करण्याचे स्वागत करू,पण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसे करण्याची शक्यता नाही. भारताच्या वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते डिसेंबर 2022 दरम्यान भारत-पाकिस्तानचा व्यापार 1.35 अब्ज डॉलर्स इतका होता. तर पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या चीनसोबतचा भारताचा व्यापार 87 दशलक्ष डॉलर्स इतका होता.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली असून पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर उभा आहे. त्यामुळे पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. 

Pakistan Hina Rabbani : भारतात हिंदू राष्ट्रवादी प्रशासन

भारताशी संबंध पूर्ववत करण्याबाबत बोलताना हिना रब्बानी खार म्हणाल्या की, भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध सुधरायचे असतील तर व्यापार हा एकमेव मार्ग आहे. पण भारतात सध्या हिंदू राष्ट्रवादी प्रशासन आहे आणि त्या सरकारकडून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडायचं काम सुरू आहे. भारताच्या सध्याच्या सरकारमध्ये काहीही योग्य असू शकत नाही. तेथे विशेष लोक सत्तेत आहेत. समस्या कशी सोडवायची हे त्यांना कळत नाही. ते फक्त समस्या वाढवतात.

पाकिस्तानी राजकारण्यांचे वादग्रस्त वक्तव्य

अलिकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानी राजकारणी भारताविरोधात सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी 2002 मध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र असल्याचं म्हटले होते.

भारताची पाकिस्तानबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. पाकिस्तान जोपर्यंत भारतातील दहशतवादी कारवाया थांबवत नाही, जोपर्यंत दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं बंद करत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा न करण्याची भूमिका भारताने घेतली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकले आहेत. 

ही संबंधित बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts