Lok Sabha Election 2024 first time voters expectation from state government and MP MLA Of district or constutuency

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पंतप्रधान मोदींनी नव्या मतदारांना मतदानासाठी (First Time voter) आवाहन केलं आहे. मात्र हेच नव्या मतदारांनी सरकारच्या (Lok Sabha Election 2024) नावाने किंवा लोकप्रतिनिधींवर ताशेरे ओढले आहे. माझा बाप शेतकरी आहे त्यांना कधी कोणत्या खासदाराने विचारलं नाही?, खासदाराने आमच्यासाठी आतापर्यंत काय केलंय़? शेतकरी नाराज आहेत त्यांचं काय?  असं म्हणत नव्या मतदारांनी आपलं ठाम मत व्यक्त केलं आहे तर काहींनी मतदानासाठी आम्ही उत्सूक आहोत मात्र आम्हालादेखील राजकारणात यायचंय?, असं काहींनी म्हटलं आहे. राज्याच्या विविध शहरातून आलेल्या नव्या मतदारांनी आपल्या भावना स्पष्ट केल्या आहेत. 

शेतकरी मोठा व्होटर

आताची 2024 ची लोकसभा आहे हे खूप वेगळी असणार आहे.राजकारणामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेतकरी गट मुख्यतः मोठा गट आहे आणि  अनुकूल बाजूच्या सरकारवर शेतकरी गट खूप नाराज गट आहे आणि प्रतिकूल गटानेदेखील  शेकऱ्यांवर लक्ष दिलं नाही आहे. येणारी लोकसभा ही शेतकरी प्रश्नावर जास्त अवलंबून असणारे कारण शेतकऱ्यांचे प्रश्न आजही कायम आहेत. या प्रश्नांना वाचा फोडणारी ही निवडणूक असणार असल्याचं विद्यार्थी म्हणाले. 

खासदार माझ्या बापाला विचारतो का?

बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आपल्यया परिसरातील परिस्थिती सांगितली. साधारण सगळ्याच राज्यात शेतकऱ्यांचा मोठा वर्ग आहे. मतदारही शेतकरीच जास्त आहे. मात्र आजपर्यंत एकही आमदार, खासदार शेतकऱ्यांच्या दाराशी आलेला दिसला नाही. जो लोकप्रतिनिधी माझ्या बापाचे प्रश्न मांडू शकत नाही त्याची परिस्थिती जाणू शकत नाही, त्या लोकप्रतिनिधींना आम्ही पहिल्यांदा मतदान करताना का करायचंं?,असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. 

आम्ही राजकारणात आलो तर…

त्यासोबतच अनेक विद्यार्थ्यांनादेखील राजकारणात प्रवेश करायचा आहे. मात्र आताची राजकारणातली परिस्थिती पाहता कुटुंब राजकारणात येण्यासाठी परवानगी देतील की नाही, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. महत्वाचं म्हणजे आम्ही राजकारणात आल्यावर फोडाफोडीचं राजकारण न करता शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या हिताचं राजकारण करु, असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे. 

शिकलेलाच लोकप्रतिनिधी हवा!

त्यासोबतच राजकारणात सध्या शिकलेल्या लोकप्रतिनिधीला जास्त महत्व आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील खासदार शिकलेला असेल तरच तो विकासाच्या मुद्द्यांवर विचार करु शकेल आणि तरुणांच्या प्रश्नांना, शिक्षणाच्या परिस्थितीला समजून घेऊ शकेल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजपची नवी रणनीती; 10 ते 12 लाख नागरीकांपर्यंत कसे पोहचणार?

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts