सदाशिव लोखंडेंच्या प्रचारात कट्टर विरोधक पिचड-लहामटे आले एकत्र, मधुकर पिचड म्हणाले, ही निवडणूक आमची नाही तर मोदींची!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shirdi Lok Sabha Constituency शिर्डी : शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ आज महायुतीचा मेळावा अकोले (Akole) शहरात पार पडला. या मेळाव्याला कट्टर विरोधक आमदार लहामटे व पिचड पिता पुत्र हे प्रथमच एका मंचावर एकत्र आले.

मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), उदय सामंत (Uday Samanat), पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा पार पडला. ही निवडणूक पिचड यांची किंवा लहामटे त्यांची नसून मोदींची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र या व लोखंडे यांना विजयी करा, असे आवाहन ज्यष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांनी भाषणातून केले. 

आम्ही आपापसात लढणारे आता एकत्र आलो – मधुकर पिचड

मधुकर पिचड (Madhukar Pichad) म्हणाले की, मोदी साहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. शिव्या शाप देणाऱ्या लोकांना या निवडणुकीपासून दूर न्यायचे आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदावर बसवण्याचे काम सुद्धा मोदींनी केलं. विखे पाटील तुम्ही बिंदास जा. आम्ही आपापसात लढणारे आता एकत्र आलो आहोत. ही निवडणूक माझी नाही माझ्या मुलाची नाही किंवा आमदार लहामटे  यांची ही नाही. ही निवडणूक मोदींची आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

घराघरापर्यंत धनुष्यबाण पोहचवावा – दादा भुसे

मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले की,  शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे पुन्हा खासदार होणार आहेत. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे. शिर्डीचा खासदार निवडून आला पाहिजे. दुष्काळी भागाला जास्तीत जास्त पाणी कसे उपलब्ध करून देता येईल यावर काम करावं लागेल. घराघरापर्यंत धनुष्यबाण आपण पोहचवावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. 

एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाची अवस्था काय केली हे आपण पाहिलेच – उदय सामंत

मंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले की, पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी सदाशिव लोखंडे यांना पुन्हा निवडून द्या. मानपान, गट-तट बाजूला ठेवण्याची गरज आहे. 400 खासदारांमध्ये शिर्डीचा खासदार असला पाहिजे. मधुकरराव पिचड राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा मी राष्ट्रवादी युवकाचा प्रदेशाध्यक्ष होतो. पहिले भाजपचा मफलर आला, नंतर शिवसेनेचा (Shiv Sena) मफलर आला, नंतर राष्ट्रवादीचा मफलर आला. कार्यकर्त्यांनी असेच एकजुटीने काम करावे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) ठाकरे गटाची अवस्था काय केली हे आपण पाहिलेच आहे. मोदींचा पराभव करण्यासाठी सर्व असंतुष्ट लोक एकत्र आलेत. ज्यांना उमेदवार मिळत नाही त्यांना लोक मतदान करणार नाहीत. स्वातंत्रवीर सावरकरांचा अवमान आणि महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना लोक बाजूला करतील, असे त्यांनी यावेळी म्हटले. 

राधाकृष्ण विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांना टोला

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले की, या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. आघाडीतील भांडण संपायला तयार नाही. विरोधी पक्षाची मोट बांधण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. एका बाजूला मोदीजी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढतात आणि एका बाजूला इंडिया आघाडी पांघरून घालते. काँग्रेसचा पूर्ण सुपडा साफ झालाय.आपल्या जिल्ह्याचे नेते राज्याचं नेतृत्व करतात. त्यांना स्वतःच्या जिल्ह्यातील एक जागा मिळवता आली नाही, असा टोला त्यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना नाव न घेता लगावला. 

आणखी वाचा

Shirdi Lok Sabha : ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts