Maharashtra Weather Update warning of stormy rain in districts of Vidarbha for four days Maharashtra Weather Update Marathi NEWS

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेची लाट असतानाच काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम पाऊस किंवा वादळी वाऱ्यासह पावसाची कोसळू शकतो. राज्यात 7 ते 10 एप्रिल दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेच प्रमुख केएस होसळीकर यांनी व्यक्त केलाय. 

विदर्भ ऑरेंज ‘अलर्ट’वर 

विदर्भात काही ठिकाणी ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील काही जिल्ह्यांत गारपीटही होऊ शकते, असं होसळीकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. वेधशाळेने गुरुवारी 4 एप्रिलपासून राज्यात मेघगर्जना होईल, असं म्हटलं होत. त्यानंतर होसळीकर यांच्याकडून वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असल्याचा इशार देण्यात आलाय. 

यवतमाळ आणि वाशिम जिल्हा ऑरेंज अलर्टवर 

हवामान विभागाने विदर्भातील यवतमाळ आणि वाशिम जिल्हाला ऑरेंज दिला आहे. त्यामुळे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. तर 15 जिल्ह्यांना गारपीटीचा कोणताही धोका नसल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Travel : बजेट असेल 10 हजार, तर ‘ही’ ठिकाणे एक्सप्लोर कराल! विचार कसला? उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासह प्लॅन करा

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts